: दीनदयाळ अंत्योदय योजना -राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न
भंडारा, दि.7 :नगरपरिषद भंडारा तर्फे दीनदयाल अंतर्गत योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहर संघ वस्ती स्तर ,संघ व सदस्य यांचे व्यवस्थापकीय व उद्योजकता विकास तीन दिवसाचे प्रशिक्षण नुकतेच ऑफिसर क्लब येथे घेण्यात आले.काल या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला .यावेळी मुख्याधिकारी नगरपरिषद भंडारा करणकुमार चव्हाण यांनी उपस्थित महिला सदस्यांना मार्गदर्शन केले.
या तीन दिवसीय कार्यक्रमांमध्ये जितेंद्र गेडाम, प्रवीण पडोळे, उषा कावळे ,प्रवीण चाकोते उद्योग सल्लागार, निशिकांत भेदे उद्योजक सल्लागार ,माधुरी खोब्रागडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बचत गटांच्या शंभरहून अधिक महिला उपस्थित होत्या.या प्रशिक्षणामध्येमध्ये नेतृत्व विकास ,व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य तसेच उद्योगाचे विविध टप्पे उद्योगाचे विविध प्रकार व प्रसार याविषयी जितेंद्र मेश्राम, साकोली यांनी मार्गदर्शन केले. तर मार्केटिंग, ब्रँडिंग पॅकेजिंग, प्रचार प्रसिद्धी आणि व्यवसाय विस्तारावर निशिकांत भेदे यांनी सविस्तर सादरीकरण केले.
प्रशिक्षणानंतर बचत गटाच्या महिला सदस्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. त्यानंतर नेटवर्क मार्केट आणि ऑनलाईन मार्केटिंग यावर उद्योग चर्चासत्रात श्री. सोनवणे उद्योग सल्लागार व हेमंत चंदवासकर यांनी मार्गदर्शन केले .तर विक्री कला, कौशल्य व्यवसायाची ओळख याबाबत देखील समूह सदस्यांनी चर्चा केली.
प्रवीण चाकोते उद्योग सल्लागार यांनी उद्योगाचे रजिस्ट्रेशन लायसन आणि विविध योजनांची बाबत प्रशिक्षण दिले.समारोपिय कार्यक्रमाला प्रशिक्षण संपूर्ण यशस्वी पूर्ण करणाऱ्या सर्व महिलांना मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ ,प्रशिक्षक उपस्थित होते.