सड़क/अर्जूनी। येथील कार्यक्रमात पोलीस पाटील संघटनेच्या वतीने नुकतीच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजीतदादा पवार यांची भेट घेउन चर्चा केली असता पोलीस पाटलांच्या मागन्याबाबद शासन सकारात्मक असुन यावर निश्चित निर्णय घेतला जाईल असे सांगितले.या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री खा प्रफूलभाई पटेल,पालक मंत्री ना धर्मरावबाबा आत्राम,आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार सुभाष कारेमोरे,माजी विधान परिषद सदस्य राजेंद्र जैन इत्यांदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस पाटील संघाचे राज्यकार्याध्यक्ष भृंगराज परसुरामकर यांनी उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांची भेट घेउन पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करन्यात यावी, सेवानिवृत्तीचे वय ६० वरुण ६५ करन्यात यावे,सर्व सेवानिवृत्त पोलीस पाटलांना पुढील आयुष्याकरिता सेवानिवृत्तीची योजना सुरु करावी इत्यांदी मागन्याबाबद निवेदन देउन चर्चा केली असता सदर प्रस्तावावर शासन सकारात्मक निर्णय घेणार असुन राज्यातील पोलीस पाटील, आंगनवाड़ी सेविका, आशा सेविका इत्यांदी चे प्रश्न सोडविन्यास कटीबद्ध असल्याचे सांगीतले.या प्रसंगी खा प्रफूलभाई पटेल यांनी या विभागाचे बाबतीत अंतिम प्रस्ताव तय्यार झाले असतील तर त्याची अधिकृत घोषणा व अमलबजावणी लवकरात लवकर करावी असे सांगीतले.चर्चे अंति भृंगराज परसुरामकर यांनी सांगीतले. ना अजीतदादा पवार यांचे सोबत झालेल्या वाटाघाटी सबंधी आम्ही आशावादी असुन शासन यावर लवकरच निर्णय करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.या प्रसंगी पोलीस पाटील संघाचे जिल्हाउपाध्यक्ष रमेश टेंभरे, कोषाध्यक्ष श्रीराम झिंगरे,जिल्हा सचिव राजेश बन्सोड,विलास साखरे, महिला जिल्हाअध्यक्षा सौ नंदाताई ठाकरे, उपाध्यक्षा अनिता लंजे, उपशाखा अध्यक्ष सुरेश बोरकर,बनवाली मंडल,लालचंद मच्छीये,प्रेमराज टेंभरे, मनोहर सोनवाने, हेमलता बावणकर,शिवलाल सराटे,इत्यांदी पोलीस पाटील उपस्थित होते.