अर्जुनी मोर. —शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना तथा तहसील कार्यालय अर्जूनी/ मोरगावच्या वतीने प्रतापगड येथे महाशिवरात्री निमित्त मतदान जागृती या विषयावर पथनाट्य सादर कऱण्यात आले. याप्रसंगी प्रजित नायर जिल्हाधिकारी गोंदिया, वरूणकुमार शहारे उप विभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव, अनिरुद्ध कांबळे तहसिलदार अर्जुनी मोरगाव,प्रतापगड चे सरपंच भोजराज लोगडे, डॉ. एम. आर. दर्वे, डॉ. आशिष कावळे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रमुख्याने उपास्थित होते. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, निवडणुकीत योग्य उमेदवार निवडून यावेत, मतदान करताना निवडणुकीत कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, मतदाराने स्वतःला विकू नये व निर्भयपणे मतदान करावे. अशा विषयांना पथनाट्यातून सादर करुन उपस्थितांचे प्रबोधन केले. पथनाट्यात रासेयोचे स्वयंसेवक तन्मय चांदेवार, कैलास नंदरधने, अमिषा चौधरी, चुन्नी भेंडारकर, कृपाली गुरनुले, रेशमा डोंगरवार, मानसी शहारे, चंदा गिरीपुंजे, श्रेया चवरे, संजित राखडे, प्रणाली खरवडे, श्रीवर्धन गोंडाणे, धीरज रंगारी सहभागी होत. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. आर. दर्वे, डॉ. आशिष कावळे, डॉ. स्वाती मडावी यांनी परिश्रम घेतले. हजारो यात्रेकरूंच्या उपस्थीतीत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.