सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव येथील नुतणीकरण केलेल्या बॅरेकचे उदघाटन

0
23

विदयार्थ्याना स्पर्धा परिक्षा पुस्तके व शुज चे वितरण…

गोंदिया,दि.14ः नक्षलग्रस्त आदिवासी भागात असलेल्या सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव येथील जवानांच्या वास्तव्याकरीता असलेल्या बॅरेकचे बांधकाम हे अतिशय जुने असल्यामुळे बरेच ठिकाणी पडझड झाले होते.तसेच पावसाचे पाणी त्या ठिकाणी गळत असल्याने पोलीस जवानांना बऱ्याच अडचणींना तोंड दयावे लागत होते. सदरची बाब  पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांचे निदर्शनास आल्याने त्यांनी तत्काळ सदर बॅरेकचे दुरुस्ती व नुतणीकरण करण्याचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार बॅरेकची आवश्यक ती दुरुस्ती विदयुत फिटींग, रंगरंगोटी, दारे खिडक्या, पत्रे व सिलिंग इत्यादी कामे करण्यात आली.त्या नुतणीकरणे केलेल्या बॅरकचे उदघाटन १३ मार्च रोजी जिल्हयाचे अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या शुभ हस्ते पार पडले.तसेच सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगांव यांचे वतीने कम्युनिटी पोलीसींग दादालोरा एक खिडकी योजने अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

AOP गोठणगाव येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यांना आगामी पोलीस भरतीच्या अनुषंगाने तसेच दिनदयाल उपाध्याय आदिवासी आश्रमशाळेचे विद्यार्थी यांची गरज लक्षात घेवून रोटरी क्लब साउथ इस्ट नागपूर व जिवन आधार बहुददेशीय सामाजिक संस्था या NGO शी प्रभारी अधिकारी गोठणगाव तसेच प्रभारी अधिकारी भा.रा.ब. २ यांनी सतत पाठपुरावा करून शूज उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली. सकारात्मक प्रतिसाद देवून राजीव वरभे, अध्यक्ष रोटरी क्लब साउथ इस्ट नागपूर तसेच जिवन जवंजाळ, संस्थापक अध्यक्ष जिवन आधार बहुद्देशीय सामाजिक संस्था, यांनी एकूण १३५ विदयार्थी व प्रशिक्षणार्थी यांचेकरीता स्पोर्ट्स शूज उपलब्ध करून दिले. ज्याचे वितरण अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी भरतीपूर्व प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देणारे AOP गोठणगावचे प्रशिक्षक पोलीस अंमलदार पो.शि. नागेश देवकर , पो. शि.रत्नशिल मेश्राम यांचा विशेष सत्कार प्रमुख अतिथी यांचे हस्ते करण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिवन बहुददेशीय आधार संस्थेचे अध्यक्ष जिवन जवंजाळ , रोटरी क्लब नागपूर साउथ इस्टचे अध्यक्ष राजीव वरभे , केशोरी पो.स्टे.चे सपोनि जोगदंड , देवरीचे सपोनि आनंद घाडगे गोठणगावचे सरपंच संजय ईश्वार हे हजर होते.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पो.उप.नि. सुनिल चव्हाण , तर प्रास्ताविक सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव चे प्रभारी अधिकारी सपोनि सचिन घाटे यांनी व आभार प्रदर्शन पोउपनि शुभम नवले यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स.फौ. घोरमारे , पो.हवा. भोवते , मडावी , मिसार , थेर , पुराम , अविनाश कटरे , तुरकर , सुनिल राखडे , भारती पोलीस नाईक राऊत,नखाते व पो.शि. गभने, लिल्हारे , मेश्राम , देवकर यांनी परिश्रम घेतले .