
नागपूर,दि.14ः भारत_जोडो_न्याय_यात्रा दरम्यान ओबीसी युवा अधिकार मंचच्या कार्यकर्त्यांची काँग्रेसचे राष्ट्रिय नेते खासदार राहुल गांधी यांची धुळे येथे भेट घेत जातिनिहाय जनगणना,केंद्रिय सचिवालयात ओबीसी सचिव,केंद्रीय विश्वविद्यालयात ओबीसी प्राध्यापक आणि जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी या चार मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली.यावेळी ओबीसी युवा अधिकार मंचच्या शिष्टमंडळाशी चर्चा करतांना राहुल गांधी यांनी(13 मार्च रोजी) जातिनिहाय जनगणनेसाठी घेतलेल्या संकल्पाचे समर्थन करण्यात आले.यावेळी ओबीसी युवा अधिकार मंच सयोंजक उमेश कोर्राम,पियूष आकरे, कृतल आकरे, नयन कालबांधे,राहुल वाढई, यजुर्वेद सेलोकर,राकेश माळी,हर्षल चव्हाण उपस्थित होते.
ओबीसी युवा अधिकार मंचच्या युवकांनी राहुल गांधी यांच्याशी चर्चा करतांना ज्या जोमाने दररोज ओबीसी, दालित,आदिवासी ,अल्पसंख्यांक, महिलांच्या विषयांवर आपण बोलत आहात,त्याच जोमाने तो मुद्दा गावागावात पोहचला पाहिजे.याकरीता ओबीसी युवा,विद्यार्थी,संघटना जातिनिहाय जनगणनेसाठी इंडिया आघाडी सोबत कशाप्रकारे प्रभावीपणे काम करू शकतील यावर त्यांचे लक्ष केंद्रित करण्यात आले. काँग्रेस सोबतच देशातील इंडिया आघाडीतील सर्व पक्ष आणि ओबीसी संघटनांनी एकत्र समन्वयाने काम करण्यासाठी त्यांनी आपल्या पक्षाला आदेश द्यावे असे सांगण्यात आले. खासदार राहुल गांधी यांनी वरील सूचनांवर लवकरच काँग्रेस पक्ष संघटनेला अमंलबजावणीकरीता तसे आदेश देण्यात येतील असे आश्वासन दिले.सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेवून गावागावात पोहचून 2024 ची लढाई जिंकायची असल्याचे राहुल गांधी यांनी ओबीसी युवा अधिकार मंच सोबत चर्चेत सांगितले.