प्रत्येक महिलांनी बोलते होणे काळाची गरज-रजनी रामटेके

0
14

तिरोडा,दि.14- आजचा काळ व परिस्थती बघता तसेच स्त्री पुरुष समानतेची जाणीव ठेवून जिथे विरोध करायचा तिथे विरोध करणे आणि जिथे बोलायचा तिथे प्रत्येक महिलेणी बोलते होणे ही आज काळाची गरज आहे.आज जागतिक महिला दिना निमित्त राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समनवयक आणि महिला व बालकाचे सहायता कक्ष, शहर पोलीस ठाणे गोंदियाच्या समुपदेशक रजनी रामटेके यांनी उपस्थित महिलांना आव्हान केले.
राजगिरी बहु. सामाजिक संस्था, गोंदिया व सावित्रीच्या लेकीं ग्रुप च्या वतीने तिरोडा येथे डॉ बाबा साहेब आंबेडकर सभागृह खैर लांजी रोड तिरोडा येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते ज्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रजनी रामटेके ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य रोहित तिरपुडे, बौद्ध महासभेचे देवानंद शहारे, भारतीय बौद्ध म्हसभाचे तालुका अध्यक्ष राजविलास बोरकर,शिक्षक गजभिये, राजगिरी संस्थेचे संचालक धीरजकुमार मेश्राम तर राजगिरी संस्थेच्या सदस्या दिनेश्वरी साखरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
उपस्थित पाहुण्यांनी महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय भाषणात रजनी रामटेके यांनी उपस्थित महिलांना जागतिक महिला दिन का मानण्यात येतो त्याबाबद्दल माहिती दिली तसेच महिलेने अंधश्रद्धेत गुरफटून न राहता गरुड झेप घेणे महत्वाचे आहे हे सांगत असून कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, बाल विवाह, कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार, पोक्सो, अशा विविध कायद्यावर सविस्तर मार्गदर्शन करून प्रत्येक महिलांनी सावित्री, रमाई, जिजाऊ च्या किमान 10% तरी गुण आत्मसात करून आपल्या दैनंदिन जीवनात ते उपयोगात आणाव्यात असे आव्हान करत महिलांनी अशा कार्यक्रमा निमित्त एकत्र येऊन आपली उत्स्फूर्त भागीदारी दाखवावी.
कार्यक्रमाची सुरुवात आई सावित्री, जिजाऊ, रमाई, महात्मा फुले व डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रजवलन करून करण्यात आली तसेच स्वागत गीताच्या माध्यमातून पाहुण्यांचे स्वागत व उपस्थित महिला व मुली द्वारे सुंदर वेष भुसेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आलेत.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्र संचालन व प्रास्ताविक प्रीती रामटेके यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्योती साखरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीरित्या प्रीती रामटेके, प्रीती चौहान, ज्योती सवनकर, रुपाली चौहान, विना मेश्राम, रचना चिमनकर, सुप्रिया कोटांगले, अलका कोटांगले, पौर्णिमा नन्दागवडी, सुजाता डोंगरे, अंजु चौहान, डार्विन शेंडे, अर्चना चीचखेडे, ज्योती साखरे, सीमा साखरे यांनी अथक परिश्रम घेऊन चहा नाश्ता करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.