देश व राज्याचे विकासासाठी केंद्र व राज्य सरकार कटीबध्द:-माजी मंत्री राजकुमार बडोले

0
10

सडक अर्जुनी: केंद्रात व राज्यात सध्या आपल्या हक्काचे सरकार आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतातील शेवटच्या घटकापर्यंत विविध योजना थेट पोहचविल्या आहेत. देशातील सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारने निधीची कमतरता भासु दिली नाही.अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रासाठी आपन भरपुर निधी आणुन विकास करीत आहोत.काही गावांमधे तांत्रिक अडचनीमुळे विकास थांबला असेल.तर येणा-या काळात तो पुर्ण करण्यात येईल असा आशावाद माजी मंत्री ईंजी राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला.

अर्जुनी मोर.विधानसभा क्षेत्रांतर्गत मौजा डव्वा ता.सडक अर्जुनी येथे परमात्मा एक सेवक मंडळासाठी सभामंडप बांधणे (रु. १० लक्ष) तसेच भुसारीटोला येथे रस्ता खडीकरण (रु.१५ लक्ष) या कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना माजी मंत्री बडोले बोलत होते.

भूमीपूजन कार्यक्रमात पंचायत समिती सभापती सौ.संगिताताई खोब्रागडे, उपसभापती शालिंदर कापगते, जिल्हा परिषद सदस्य डॉ.भुमेश्वर पटले, डव्वा ग्रा.प.संरपच सौ. योगेश्वरीताई चौधरी, भुसारीटोला ग्रा.प.संरपच सौ. मायाबाई राऊत, विस्तारक गौरेश बावनकर, तालुका महामंत्री शिशीर येळे, तुकाराम राणे, विवेक राऊत, विलास चौव्हाण, उमेश ब्राम्हणकर, गोरेलाल कुसराम, रामकृष्ण मेंन्ढे,श्रीपत थेर, शेषराव मौजे, देशमुख, गुड्डू डोंगरवार, सुनिल घासले, तेजराम खोब्रागडे, मोरेश्वर वाघाडे, भुमेश्वर वैद्ये यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.