शेतकऱ्यांच्या पिक कर्जावरील ६% व्याज रद्द करा:- मिथुन मेश्राम

0
23

गोंदिया,दि.१४ः शुन्य टक्के व्याजाने कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना आकारण्यात आलेले.‌६% व्याज रद्द करण्यात यावे.जेणेकरून शेतकर्यांना पिक कर्जाची रक्कम परतफेड करणे शक्य होईल.सरकारने घेतलेला हा निर्णय चुकीचा असून शेतकऱ्यांचे शोषण करण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करीत असल्याचा आरोप शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आला आहे.सदर व्याज रद्द करण्याच्या मागणीला घेऊन आज गुरुवारला सडक अर्जुनी येथील नायब तहसीलदार शिंदे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले.

निवेदनात शेतकरी यांना वेळेवर त्यांचा धानाचे चूकारे व‌ बोनसची रक्कम मिळाली नाही. शेतकरी यांना कर्ज भरणे कठीण आहे. असा परीस्थिती मध्ये शेतकऱ्यांकडून व्याज घेणे योग्य नाही. शेतकरी आधीच कर्जबाजारी झाला आहे.सरकारने अजून पर्यंत महामंडळाला पैसे पाठविले नाही.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोनसची रक्कम सायंकाळीपर्यंत जमा होईल असे सांगितले मात्र आठवडा लोटूनही अजून पर्यंत कोणाच्याच खात्यात बोनसची रक्कम जमा झाली नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्यांकडुन 6% व्याज पीक कर्जावर घेत आहेत आणि सांगतात की केंद्र सरकार व राज्य सरकार तीन टक्के प्रमाणे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी मार्फत पाठविले जातील. शेतकऱ्यांच्या हक्काचे धानाचे पैसे यांना द्यायला वेळ लागतो. तर हे व्याजाचे पैसे देतील हे कशावरून आणि द्यायचेच आहेत तर त्यांनी डायरेक्ट बँकांना द्यावे.शेतकऱ्यांवरील अन्याय खपवुन घेणार नाही. ८ दिवसात हा निर्णय रद्द करावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा मिथुन मेश्राम कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांनी दिला. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष मंजु डोंगरवार, युवक जिल्हाध्यक्ष आशिष येरणे, तालुका महिला अध्यक्ष रूपा गिरेपुंजे, तालुका युवक अध्यक्ष खुशाल डोंगरवार, देवानंद तागडे, रमेश डोंगरवार, अरविंद मेंढे, गजानन सुकारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.