मतदानासाठी जनजागृतीपर रॅली

0
8
वाढदिवसाच्या शुभेच्छा

भंडारा, दि.23: केंद्रीय निवडणूक आयोगाचे (Election Commission of India) महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 25 मे पर्यंत पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून भंडारा जिल्हातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. जिल्हातील मतदार बंधू भगिणीमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत लाखांदूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने रॅलीच्या माध्यमातून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जनजागृतीपर रॅली काढण्यात आली.

यावेळी मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे असे जाहीर आवाहन करण्यात आले.या अभियानांसाठी प्राचार्य एस. के. खोब्रागडे सर, व सर्व शिक्षकवृंद, लाखांदूर नगरपंचायतचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले. यावेळी शिक्षक-शिक्षिका व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.