तिरोडाची खुशी गोवा फॅशन विकमध्ये रनरअप

0
23
वाढदिवसाच्या शुभेच्छा

तिरोडा- येथील खुशी किशोर राऊत हिने मिस फेस ऑफ द नेशन गोवा फॅशन विकमध्ये रनरअप ठरली. तिरोडा सारख्या छोट्या शहरवासीयांसाठी ही कौतुकाची बाब असून ग्रामीण भागातील मुलींसाठी खुशी प्रेरणादायी ठरली आहे.
खुशी नागपूर येथे समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहात राहते. ती आंबेडकर कॉलेजला बीएससी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या वर्षात आहे. शिक्षण घेत असतानाच तिला मॉडलिंग, नृत्याची आवड जडली. तिने गोवा फॅशन विकमध्ये भाग घेतला. 5 मार्च रोजी गोव्यात झालेल्या गोवा फॅशन वीकमध्ये ती रनरअप ठरली. या स्पर्धेमध्ये 60 स्पर्धकांनी भाग घेतला. भविष्यात मिस फेमिना हे आपले स्वप्ने असल्याचे खुशीने सांगीतले. तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.