बुलढाणा : कोण-कोण येणार मागे, अन् कोण उमेदवार जाणार पुढे ? याची शिगेला पोहचलेली उत्कंठा अखेर आज सोमवार 8 एप्रिल रोजी संपुष्टात आली. (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडी व महायुतीतील बंड आज दुपारी तळपत्या उन्हात थंड झाले असून, महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी प्रत्यक्ष जाऊन नामांकन अर्ज मागे घेतला, तर (Mahayuti) महायुतीतील बंडखोर उमेदवार विजयराज शिंदे यांनी सुचकाकरवी त्यांचा नामांकन मागे घेतला. अपक्ष रविकांत तुपकर व संदीप शेळके यांचे अर्ज कायम आहेत, 25 पैकी 4 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्यामुळे, आता 26 एप्रिल साठी 21 उमेदवार रिंगणात कायम उरले आहेत !
बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 29 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल होते. यात चार उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले असल्याने 25 उमेदवार कायम होते. तर अर्ज मागे घेण्यासाठी आठ एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली होती. आज दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटच्या मदतीपर्यंत एकूण 4 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता (Buldhana Election) निवडणूक रिंगणामध्ये 21 उमेदवार उरले आहेत. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये विजयराज शिंदे आणि ज्ञानेश्वरदादा पाटील या दोन दिग्गजांचा समावेश आहे.
अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये विजयराज शिंदे, ज्ञानेश्वरदादा पाटील, दिपक भानुदास जाधव- पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक व नामदेव दगडू राठोड अशा चार उमेदवारांचा समावेश आहे. आता (Buldhana LokSabha) बुलढाणा लोकसभेच्या रिंगणामध्ये २१ उमेदवार कायम असून त्यांच्यामध्ये लढत होणार आहे.
लढतीत कायम असलेले उमेदवार
प्रतापराव गणपतराव जाधव- शिवसेना, रेखा कैलास पोफळकर- अपक्ष, प्रताप पंढरीनाथ पाटील- बहुजन मुक्ती पक्ष, रविकांत चंद्रदास तूपकर- अपक्ष, असलम शहा हसन शहा- महाराष्ट्र विकास आघाडी, महंमद हसन इनामदार- मायनॉरिटी डेमोक्रॅटीक पार्टी, सुमन मधुकर तिरपुडे- पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक, नंदू जगन्नाथ लवंगे- अपक्ष, उद्धव ओंकार आटोळे- अपक्ष, संदीप रामराव शेळके- अपक्ष, गजानन जर्नादन धांडे- अपक्ष, नरेंद्र दगडू खेडेकर- शिवसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे, मच्छिंद्र शेषराव मघाडे- सोशालिस्ट पार्टी इंडिया, ज्ञानेश्वर पुरूषोत्तम गणेश पाटील- अपक्ष, अशोक वामन हिवाळे- अपक्ष, वसंत राजाराम मगर- वंचित बहुजन आघाडी, संतोष भिमराव इंगळे- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर, विकास प्रकाश नांदवे- भिमसेना, बाळासाहेब रामचंद्र इंगळे- अपक्ष, दिनकर तुकाराम संबारे- अपक्ष, माधवराव सखाराम बनसोडे- बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी, गौतम किसनराव मघाडे- बसपा असे २१ उमेदवार बुलढाण्याचा खासदार बनण्यासाठी उत्सुक आहेत.