लाडखेड फाट्याजवळ भरधाव कारचा अपघात; एक ठार

0
5

यवतमाळ:- तालुक्यातील बोरी अरब येथील रहिवासी मनोज शिवकुमार बाजोरिया (५५) हे त्यांची कारने आज सोमवार दि. ८ एप्रिलला दुपारी १:०० वाजता दरम्यान यवतमाळ कडे निघाले असता बोरी पासून काही अंतरावर असलेल्या लाडखेड फाट्याजवळ त्यांचे कार वरील नियंत्रण सुटल्याने कार (Car)भरधाव वेगात रस्त्याखाली उतरली. यामध्ये चालक मनोज बाजोरिया हे कारमधून बाहेर फेकल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

बोरीअरब पासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला असून मृतक मनोज बाजोरिया यांच्या गाडीचे नियंत्रण सुटण्यामागे अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला कट मारला असावा किंवा वन्यप्राणी(Wild Animal) कार समोर आला असावा अशी चर्चा घटनास्थळावर सुरू होती. मनोज बाजोरिया यांचे यवतमाळ येथे रंगोली कलेक्शन नावाचे दुकान होते. लाडखेड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मृतक मनोज बाजोरिया यांच्या मागे आई, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.