अखिल ढिवर समाज विकास समितीची आरक्षण संवाद महासभा संपन्न
गोंदिया;- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मंत्र शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा या प्रमाणे ढिवर समाजाने आपल्या संविधानिक अुनसूचित जातीच्या आरक्षणासाठी संघटित व्हावे असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक, विचारवंत माणिक गेडाम यांनी केले. अखिल ढिवर समाज विकास समितीच्या वतीने दिनांक 12 मे 2024 रोजी इंद्रराज सभागृह सार्वजनिक वाचनालय भंडारा येथे आरक्षण संवाद महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ साहित्यिक, विचारवंत माणिक गेडाम अध्यक्षस्थानी होते तर सह अध्यक्ष म्हणून प्रा. जनार्दन नागपूरे तसेच प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. योगेश दुधपचारे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. रामकृष्ण शिंदे, डॉ. प्रकाश महालगावे, के. एन. नान्हे, दिनानाथ वाघमारे, डॉ. अविनाश नान्हे, प्रा. डॉ. दिशाताई गेडाम, प्रकाश पचारे, टेकचंद मारबते, गिरीधारी भोयर, अशोक शेंडे, ॲङ गौरी शेंडे उपस्थित होते.
माणिक गेडाम पूढे म्हणाले, ढिवर समाज सन 1936 ते 1950 पर्यंत अनुसूचित जातीत सामाविष्ठ असतांना आज तो स्वत:च्या संविधानिक आरक्षणापासुन वंचित आहे. हा समाज अनुसूचित जातीच्या यादीमध्ये कायम असता तर आज या समाजाची प्रगती होवू शकली असती परंतु या समाजाचे हे दुर्दैव आहे. म्हणून या समाजाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांची गरज असुन त्यांना अपेक्षित असे संघटन आपल्याही समाजात व्हावे, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
या सभेचे प्रास्ताविक समितीचे कोषाध्यक्ष डॉ. माधवन मानकर यांनी केले. तर प्रमुख मार्गदर्शन प्रा. डॉ. योगेश दुधपचारे यांनी आरक्षण म्हणजे काय?, आरक्षणाची गरज कशासाठी?, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व समाजाला संघटित होण्याचे आव्हान केले. भविष्यात महाआंदोलनाची दिशाही ठरवावी लागेल असेही संकेत त्यांनी यावेळी दिले. प्रा. जनार्दन नागपूरे यांनी समाजात काम करणाऱ्या संघटना संघर्ष वाहिनी, एकलव्य सेना या ही संघटनांनी या अखिल ढिवर समाज विकास समितीच्या महाआंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान केले. अखिल ढिवर समाज विकास समितीचे अध्यक्ष मनोज केवट यांनी आजपर्यंतचा राज्य व केंद्र सरकार सोबत केलेल्या पत्रव्यवहारासंबंधी माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त कार्तिकस्वामी मेश्राम यांनी ढिवर समाजाच्या या आरक्षणाच्या वंचितपणाचा अमृतकाळ सुरु असलेल्या वेदनेवर पोवाडा सादर करुन समाजाची वेदना मांडली. पवनी तालुका येथील धनराजजी मेश्राम यांनी सामाजिक परिस्थितीवर गीत सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
तसेच भंडारा व गोदिंया जिल्हातील तालुकानिहाय प्रतिनिधी परेश दुरुगवार, राजु वलथरे, अर्जुन मेश्राम, सौ. प्रणिता मेश्राम, सुभाष उके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमांचे सुत्र संचालन विष्णु चाचेरे, लाखनी यांनी केले तर आभार केशव कोल्हे, अर्जुनी/मोरगांव यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मधुकरजी बावनउके, गोविंद मखरे, योगेंद्र दुधपचारे, दिगांबर चाचेरे, चर्तुभुज भानारकर, अमोल वलथरे, सुजाता मारबते, निशा मखरे, खेमु मेश्राम, राजेद्रं चापरे, संदिप मारबते, रुपेश भानारकर, किशोर शेंडे, श्रीकृष्ण शेंडे, राजन नवदेवे, लहु कांबळे, संतोष मेश्राम, अरुन नान्हे, मनिराम नान्हे, आशिष दिघोरे, लिलाधर शिवरकर, नंदू उके, कोमेश कांबळे, अक्षय वाघधरे, मनिराम मौजे, राजेश वलथरे, आशा दुधपचारे, अर्चना दुधपचारे, गणराज नान्हे, मनोज मेश्राम, होसलाल वलथरे, प्रयास मानकर, हेमंग मखरे, मंथन मखरे आदींनी सहकार्य केले. यावेळी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.