गोंदियात बुद्ध जयंती निमित्त भव्य रॅलीचे आयोजन उद्या

0
14

निशा बौद्ध यांची संगीतमय मैफल शुक्रवारी

गोंदिया ता.22 मे :-जगाला शांती आणि करुणेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धांच्या 2586 व्या जयंतीनिमित्त उद्या गुरुवारी (ता.23) भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्व. जयंती उत्सव समितीच्या वतीने ही रॅली सायंकाळी 4.00 वाजता गोंदिया नगर भ्रमण करून तथागत बुद्धांचा संदेश प्रसारित करेल.
येथील भीमनगरच्या भव्य मैदानावर ता.23 आणि 24 मे रोजी दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित आहे.
दिनांक 23 मे रोजी सकाळी बुद्धवंदना करून जयंती समितीचे अध्यक्ष गेंदलाल तिरपुडे यांच्या अध्यक्षते खाली सहयोग ग्रुपचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर जयेश रामादे यांच्या हस्ते उदघाट्न होईल . त्यानंतर सायंकाळी 4 वाजता रॅलीचे प्रस्थान होईल.श्री तिरपुडे यांनी दिलेल्या माहिती नुसार या दोन दिवशीय कार्यक्रमा दरम्यान दिनांक 24 मे रोजी,नागपूरचे भदंत डॉ धम्मज्योती महाथेरो,दिक्षाभूमीचे विश्वस्त भदंत नागदिपांकर यांचे धम्म प्रबोधन होईल.तसेच राजस्थान भरतपूर येथील बहुजन मिस्सनरी गायिका निशा बौद्ध यांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित आहे.तत्पूर्वी यूनियन पब्लिक सर्विस कमिशनच्या परीक्षेत यश संपादन केलेले विद्यार्थी काजल चव्हाण, युगल के. कापगते, गौरव टेम्भूरणे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी कार्यकारी अभियंता नरेश गणवीर, इंजि अभिजित बागडे,सेल टॅक्स आयुक्त मीनाक्षी बनसोड,बसपाचे गोंदिया पंचायत समिती सदस्य राहुल मेश्राम,.जयंती समितीचे माजी अध्यक्ष नानाजी शेंडे, अक्षय वासनिक उपस्थित राहणार आहेत.
श्री तिरपुडे यांनी असेही निवेदन केले आहे की, बहुजन समाजाने बुद्ध जयंतीदिनी घरोघरी विद्युत रोषणाई करावी, पंचशील ध्वज उभारावेत,हातात मेणबत्त्या घेऊन बुद्धविहारात जाणे, आणि शेजारी पाजारी तसेच आगंतुकांना
सुजाता खीर चे वितरण करून बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देण्याचे आवाहन धम्म बांधवाना केले आहे.या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्व. जयंती उत्सव समितीने केले आहे.