गोंदिया-आपल्या वाढदिवसाच्या दिवशी नेहमीच लोकहितार्थ व नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेण्याचे स्तुत्य उपक्रम कायम ठेवत हे वाढदिवस दिव्यांगांसाठीं करत दिव्यांग व्यक्तींसाठी कानाची मशीन, ट्रायसिकल वाटप आणि कृत्रिम हाथ आणि पाय प्रत्यारोपण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. येत्या ४ जून रोजी आमदार विनोद अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक पोवार बोर्डिंग येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने दिव्यांगांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक दिव्यांगांची संख्या एकट्या गोंदिया तालुक्यात आहे. याचा आढावा घेताना आमदार विनोद अग्रवाल यांनी वारंवार दिव्यांगनांसाठी भरघोस शासकीय मदत मिळावी यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. याचाच एक भाग म्हणून दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दिव्यंगांसाठी मदतीचा हात पुढे करत कर्णबधिर नागरिकांसाठी तपासणी व कानाची मशीन बुद्ध पोर्णिमा निमित्त त्यांच्या कार्यालयात ५४ नागरिकांना वाटप करण्यात आली होती. त्यापैकी उर्वरित लाभार्थ्यांना ४ जून रोजी माशिनीचे वाटप करण्यात येणार आहे. यासोबतच दिव्यांगांनी त्यांचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करता यावे यासाठी ट्रायसिकल वाटप सुद्धा करण्यात येणार आहे.
#सामाजिक संस्थेच्या माध्यमाने कृत्रिम हाथ आणि पाय प्रत्यारोपण शिबिर
ताप्ती सेवा समिती व हरिकृष्ण फाउंडेशन यांच्या माध्यमाने आमदार विनोद अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त कन्हारटोली येथील पवार बोर्डिंग येथे चार जून रोजी कृत्रिम हात आणि कृत्रिम पाय प्रत्यारोपणाचे शिबिर सुद्धा आयोजन करण्यात आलेले असून यासाठी १ जून पर्यंत लाभार्थ्यांनी पायाचे माप देण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांचे पायाचे माप घेतले जाईल त्यांना ४ जून रोजीच वाटप केले जाणार आहे. १ जून रोजी कृत्रिम पायासाठी पोवार बोर्डिंग येथे माप घेतले जाणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने नोंदणी करावे असे आवाहन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले आहे.