सुर्य ओकतोय आग;गोंदियात मागील ३ वर्षातील सर्वाधिक तापमान

0
91

गोंदिया : विदर्भासह जिल्ह्यात उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस नवनवे रिकॉर्ड नोंदवित वाढत चालला आहे.ता.३१ व दि.०१ जून रोजी जिल्ह्याचे तापमान ४५ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले आहे. जिल्ह्यावर सुर्याचे आग ओकणे सुरू असल्याने भीषण उष्णता निर्माण झाली असून जनजीवन प्रभावित झाले आहे. नागरिक घराबाहेर निघणे टाळत असल्याने सकाळी ९ वाजतापासून रस्ते निर्मनुष्य होत आहेत. यामुळे रस्त्यासह गल्लोगल्लीत सुकसुकाट दिसून येत आहे. उल्लेखनिय असे की, (ता.३०) वर्षातील सर्वाधिक ४४.८ तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यात (ता.३१) पुन्हा ०.२ व १ जून रोजी ०.२ अंशाची वाढ नोंदविण्यात आली आहे.
पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत असलेला र्‍हास आणि वाढलेले सिमेंटीकरणाचे जंगल तापमान वाढीला पोषक ठरत आहेत. दरवर्षी गोंदिया जिल्ह्याचे तापमान ४४ अंशावर स्थिरावतो. मागील ३ वर्षात तापमानाचा उच्चांक ४४.६ अंश एवढे होते. त्यातच कालच्या तापमानाने उच्चांकी आकडा गाठला होता. त्याहूनही अधिक आज तापमानाने ४५ अंशावर पोहोचून नवा आयाम गाठला आहे.