पाणी टंचाई निवारणार्थ 5 कोटीच्या कृती आराखड्यास मान्यता

0
84

गोंदिया, दि.12 : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे 3 फेब्रुवारी 1999 चे शासन निर्णय तसेच 24 ऑक्टोबर 2008 च्या शासन परिपत्रकामध्ये निर्देशित केल्यानुसार कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि.प.गोंदिया यांनी सादर केलेले 421 गावे समावेश असलेला, 782 उपाय योजनांवरील अपेक्षीत खर्च 5 कोटी 40 लाख 30 हजार रुपये, टप्पा-3 एप्रिल ते जून 2024 या कालावधीचे पाणी टंचाई कृती आराखड्यास जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी अटी व शर्तीच्या अधिन राहून मान्यता प्रदान केली आहे.

         अटी व शर्ती पुढीलप्रमाणे. आराखड्यात कामे प्रस्तावित असले तरीही आवश्यकतेनुसार कामे प्रस्तावित करुन हाती घेण्यात यावे. किमान खर्चाच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे. उपाययोजनांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर सर्व कामे तात्काळ हाती घेऊन संबंधित गावे/वाड्यांमध्ये उन्हाळ्यात नागरिकांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय करुन द्यावी. मंजूर उपाययोजनांची ऑनलाईन माहिती भरण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद गोंदिया यांची राहील. पाणी टंचाई निवारण कार्यक्रम राबविण्याबाबत शासनाकडून वेळोवेळी निर्गमीत शासन निर्णय आणि परिपत्रकांमधील सुचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची दक्षता घ्यावी. पाणी टंचाई निवारण कार्यक्रम राबविण्या संदर्भातील नियमातील तरतुदीनुसार कामे पुर्ण करावे. नियमातील तरतुदीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा या बाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कार्यान्वित यंत्रणाची राहील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.