
गोंदिया,दि.१६ः येथील श्रीजी हॉल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह गोंदिया येथील 1988 ते 2006 पर्यंत राहणाऱ्या आजी-माजी सोबत्यांचे मित्र मिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता.त्यामध्ये प्रामुख्याने कार्यक्रमाचे आयोजक संदीप भिमटे व सिद्धार्थ बनसोड यांनी उत्तम प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन केले.सर्वप्रथम महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी आपपला परिचय सोबतच वसतिगृहातील आठवणी समाजातील आपली भूमिका व भविष्यातील समाजाप्रती वाटचाल याविषयी मनसोक्त मनोगत व्यक्त केले. वीस पंचवीस वर्षानंतर प्रथमताच सर्व मित्रमंडळी एकत्र भेटल्याने मनसोक्त गप्पा मारल्या.सदर मित्र मिलन सोहळ्यामध्ये वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमधून आयुक्ता पासून तर शिक्षण क्षेत्र कार्पोरेट जगत राजनीतिक मंच अशा सर्वच क्षेत्रांमध्ये मित्रमंडळी असल्याने एक आगळावेगळाचा आनंद सर्वांना मिळाला.चर्चासंत्रानंतर सुरुची भोज घेऊन दरवर्षी याचप्रकारे मिलन सोहळा आयोजित करण्यात यावे असे ठरवून समाजाप्रती आपली जबाबदारीची दिशा ठरवण्याविषयी सुद्धा ठरले.