अर्जुनी मोर.-पाणी पुरवठा करणा-या विहीरीत पाणबुडी मोटार काढण्यासाठी उतरलेल्या इसमाचा विहीरीत बुडुन मृत्यु झाल्याची घटना ता.18 रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास निमगाव तलाव परिसरात घडली.मृतकाचे नाव माधो सोविंदा मेश्राम वय 50 वर्ष रा.बोंडगावदेवी आहे.
याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार तालुक्यातील निमगाव येथे जलजिवन मिशन अंतर्गत पाणी टाकी व विहीरीचे काम चालु आहे.सध्या हे काम प्रगतीपथावर आहे.विहिरीचे काम सुरु असताना सदर विहिरीमधे पाणी बाहेर काढणारी पाणबुडी मोटार विहीरीत पडली होती.मोटार बाहेर काढण्यासाठी बोंडगाव देवी येथील माधो मेश्राम याला बोलाविण्यात आले.मृतक माधो हा कुठल्याही विहीरीतुन कोणतेही सामान अलगत काढण्यात पटाईत होता.त्यामुळे तो या विहीरीत उतरला विहिरीमधे अंदाजे पाच ते सहा बोअरवेल्सचे अंदाजे 24 ते 25 फुट पाणी होते.विहीरीत उतरल्यानंतर दोन ते वेळा पाण्याबाहेर आला.मात्र मोटार बांधण्यासाठी रस्सा घेवुन गेला तो वर आलाच नाही.त्यामुळे त्याचा विहीरीतच मृत्यु झाला.घटनास्थळी अग्णीशमन दल,व विहीरीतील पाणी खाली करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे.सांयकाळी सात वाजेपर्यंत मृतदेह हाती लागला नव्हता.अर्जुनी मोर.पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आहेत.