गोंदिया जिल्ह्यात घटली सारस पक्ष्यांची संख्या, यावर्षी २५ पक्ष्यांची नोंद,

0
207
वाढदिवसाच्या शुभेच्छा

न्यायालयाच्या निर्देशानंंतरही सारस संवर्धनाकडे  प्रशासनाचे दुर्लक्ष


 गोंदिया, दि.24 : जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 23 जून 2024 रोजी गोंदिया वनविभाग व जिल्ह्यातील विविध अशासकीय संस्था यांचे संयुक्त विद्यमाने सारस पक्षी प्रगणनेचे आयोजन करण्यात आले होते.२०२३ च्या तुलनेत यावर्षी ६ ने सारस पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे.गेल्या दोन तीन वर्षाचा विचार केल्यास दरवर्षी सारस पक्ष्यांची संंख्या कमी होत चालली आहे.एकीकडे सारस संवर्धनाच्या नावावर जिल्हा प्रशासन कोट्यवधी  रुपयाचे नियोजन करीत असताना सारस पक्ष्यांची संख्या कमी होत चालली आहे.न्यायालयानेही सारस पक्षी संवर्धनाकरीता जिल्हा प्रशासनाला ताकीद देऊनही जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे.

 गोंदिया जिल्ह्यातील सारस पक्ष्यांचे अधिवास असलेल्या गोंदिया, तिरोडा व आमगाव तालुक्यांतर्गत एकूण 70 वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यातील अशासकीय स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, सारस मित्र, शेतकरी व गोंदिया वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही गणना सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत केलेली असून सारस पक्षी प्रगणनेमध्ये एकूण 25 सारस पक्ष्यांची नोंद झालेली आहे. काही स्थळांवर अपेक्षित असणारे सारस पक्ष्यांची जोडपी निदर्शनास न आल्याने सदर ठराविक स्थळांवर पुन्हा चमू 3 ते 4 दिवस भेट देवून गणना करणार आहे. सदर गणना पुर्ण झाल्यानंतरच नेमकी सारस पक्ष्यांची संख्या कळेल.

           सारस पक्ष्यांची प्रगणना करण्यासाठी एकूण 39 चमू तयार करण्यात आले होते. प्रत्येक चमूमध्ये स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, सारस मित्र, स्थानिक प्रतिनिधी/शेतकरी, वन विभागातील वनपाल, वनरक्षक असे एकूण 5 ते 6 व्यक्ती सहभागी होते. सारस पक्षी प्रगणनेकरीता जिल्ह्यातील सेवा संस्था व इतर अशासकीय संस्थेचे स्वयंसेवक, सारस मित्र, शेतकरी तसेच गोंदिया वनविभागातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून सारस पक्ष्यांचे अधिवास असलेले पाणथळ जागा, नद्या, शेतांमध्ये, तलावांजवळ जाऊन पाहणी करुन सारस पक्ष्यांची प्रगणना केली.

महाराष्ट्र मध्यप्रदेश सारस गणना 2023

गोंदिया जिला – 31

बालाघाट जिला – 49

भंडारा जिला – 04

महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्य सारस संख्या 2022
गोंदिया जिला – ३४

बालाघाट जिला – ४५

भंडारा जिला – 0३

महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्य सारस संख्या 2021
– बालाघाट : ४७
– गोंदिया : ३९
– भंडारा : ०२

महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्य सारस संख्या 2020

गोंदिया- 45

बालाघाट- 56

भंडारा- 02

चंद्रपूर -01

गोंदिया जिल्ह्यातील घरट्यांची स्थिती बघितल्यास 2020 -7,2021- 6 व 2022-03 अशी झाली आह