
* सितेपार गावातील रस्त्याची दुरवस्था; अनेक ठिकाणी चिखलासह खड्यांचे साम्राज्य
* सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; ग्रामपंचायत निद्रावस्थेत
सड़क अर्जुनी- तालुक्यातील, पांढरी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येत असलेल्या सितेपार येथील मुख्य रस्त्याची पुर्ण पणाने वाट लागलेली आहे.जागोजागी खड्यांचे साम्राज्य दिसून येत असून पावसामुडे खड्यांमध्ये पाणी जमा होऊन, रस्त्यावर चिखल पसरलेले आहे.त्या कारणाने , विघार्थी,नागरिकांना आवागमन करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.असे असले तरी बांधकाम विभागाचे तसेच ग्रामपंचायतचे स्पष्ट दुर्लक्ष आहे..
सितेपार ग्रामपंचायत अंतर्गत यामध्ये शिकारीटोला,किसनपुर या लहान टोल्यांचा समावेश आहे.गावामध्ये एकच मुख्य रस्ता असून, रस्ता कित्येक वर्षापासून ऊखडलेल्या अवस्थेत आहे. दोन वर्षापुर्वी डिसेंबर महिन्यात सितेपार येथे ग्रामपंचायत ची निवडणूक पार पडली.व गावाचा कायापालट होईल या संकल्पाने ग्रामपंचायत ला युवा शिलेदार मिडाले पण गावातिल अनेक समस्या “जैशे थे”, असेच अजुनहि दिसत आहेत.
गावात समस्या तर भरपुर आहेत.गावविकासाच्या कामांची कमतरता दिसत असुन,समस्यांचा डोंगर ऊभा दिसत आहे.स्वच्छतेपासून तर चांगल्या रस्त्यांपर्यत समस्या जशाश तशा टकटकीलावून दिसत आहे.आज गावामधील मुख्य रस्त्यावर खड्यांची भरमार असून, खड्यांमध्ये ग्रामपंचायत मार्फत साधे मुरूम पण दिसत नाहि.गावापासून विकाश कोसो दुर दिसत आहे..
मुख्य मार्ग पुर्णपणाने ऊखडलेला असून,जागोजागी लहान मोठ्या खड्यांचे साम्राज्य दिसून येत असून अपघाताला आमंत्रण देत आहेत.सध्या पावसाड्याला नुकतीच सुरुवात झालेली आहे.जलजिवन योजनेअंतर्गत,गावात पाणीटाकी व पाईपलाईनचा काम सुरु आहे.पाईपलाईनच्या खोदलेल्या नालीबांधकामा च्या मातीमुडे मुडे,गावातील बरेचश्या ठिकाणी, रस्ता चिखलाने माखलेला आहे.त्याकारणाने विघार्थी व नागरींकासाठी ये -जा करणे तसेच वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.तरीपण संबंधित विभागाने तसेच ग्रामपंचायत ने खड्यांची डागडूजी करण्याची मागणी होत आहे..