‘सुंदर माझा दवाखाना’ स्वच्छता मोहीम लोकसहभागातुन यशस्वी करा

0
112

गोंदिया   सार्वजनिक आरोग्य विभागाने या वर्षी राज्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छता मोहीम जनमानसात आरोग्य सेवा अधिक सुंदर व स्वच्छ  लोकाभिमुख करण्यासाठी दि. 20 ते 27 जुन दरम्यान “सुंदर माझा दवाखाना’ हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
सरकारी रुग्णालये आणि आरोग्य संस्थेत सर्वांना समान सुविधा उपलब्ध आहेत आणि जास्तीत जास्त लोकांनी सार्वजनिक रुग्णांलयांच्या सुविधांचा वापर केला पाहिजे, याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे “सुंदर माझा दवाखाना” हा उपक्रम लोकसहभागातुन राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांनी केले आहे.ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद, आरोग्यवर्धीनी उपकेंद्र व शाळा ह्या गावातील महत्वपुर्ण संस्था असुन लोकांच्या सहकार्याने स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी या अनुशंगाने म्हटले आहे.गावातील वातावरण स्वच्छ व सुंदर राहिल्यास लोकांचे आरोग्य निरोगी राहु शकते. स्वच्छतेचे नियम नियमित पाळले तर रोगराई टाळता येवु शकते.परीसरात वृक्ष लागवड करावे.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत.कार्यक्षेत्रातील गावात साथरोग होवु नये यासाठी स्वच्छतेचे नियम पाळले तर विविध साथीचे आजार टाळ्ता येवु शकते. आरोग्य संस्थांमध्ये दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी स्वच्छता दिवस पाळला गेला पाहिजे त्यासाठी जनआरोग्य समिती, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती यांनी एकत्रित पणे स्वच्छता दिवस नियमित राबवायचा असून स्वच्छता दिनाचा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांनी याप्रसंगी दिल्या आहेत. आरोग्य विभागाने “सुंदर माझा दवाखाना” हा उपक्रम सर्व विभागांना एकत्रित करुन राबविण्याच्या सूचना ह्याप्रसंगी केल्या आहेत.
या उपक्रमांतर्गत सर्व आरोग्य संस्थांमध्ये दि. 20 ते 27 जुन या कालावधीत “सुंदर माझा दवाखाना” हा उपक्रम राबविण्यात येत असुन या उपक्रमात आरोग्य संस्था व सभोवतालचा परिसर, सर्व वार्ड,विभाग, स्वच्छतागृहे,भांडारगृहे इत्यादींची स्वच्छता करण्यात यावी, तसेच आरोग्य संस्थांच्या आवारात व दर्शनी भागात सुशोभीकरण, रंगरंगोटी आणि आरोग्य संस्थेमार्फत जनतेला देण्यात येणाऱ्या सेवांचे फलक लावण्यात यावेत, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिष मोहबे यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिक्षक यांना केल्या आहेत.