हरीजनटोली पुरगांव ते गोरेगांव रस्त्याची दुरावस्था,लोकप्रतिनिधी झोपेत

0
145

गोरेगाव,दि.२९ः तालुक्यातील पुरगाव येथील हरीजनटोली ते गोरेगांव रस्ता बांधकामाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे सदर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्ता चिखलमय झालेला असून परिसरातील लोकप्रतिनिधी कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.सदर रस्त्याच्या दुरुस्तीची अनेक वर्षापासून वाट बघत असून रस्ता बांधकामाचा शुभमूहुर्त लोकप्रतिनिधींना मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.या रस्त्याने बोरगाव,गणखैरा,सटवा,डव्वा,गोंदेखारी येथील विद्यार्थीनी विद्यार्थीना तालुका मुख्यालय असलेल्या गोरेगाव येथे हायस्कुल ते महाविद्यालयापर्यंत शिक्षण घ्यायला जांताना मात्र या रस्त्यामुळे त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.सदर रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावे,अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशा इशारा सरपंच पूजा नाईक,आदेशकुमार फुले, माजी सदस्य ग्रामपंचायत पुरगांव तेजराम वाघाडे, दिनेश करोले,प्रफूल डोंगरे,रामु चामलाटे,श्रीराम खिरेकर,राजकुमार ठाकरे,विकास राऊत,पप्पू कटरे, विजय सहारे यांनी दिला आहे.