
अर्जुनी/मोर:– स्वच्छ सर्वेक्षण “माझी वसुंधरा” नगरपंचायत अर्जुनी मोर तर्फे नगरातील ई-कचरा (इलेक्ट्रॉनिक कचरा) संकलन करण्याकरिता नगरातील दुकानदार यांना आवाहन करण्यात आले होते. त्यामध्ये जाड प्लास्टिक ने तयार केलेली मोठी यंत्रे, खराब झालेले वातानुकूलित उपकरण ,कंप्यूटर, टेलिव्हिजन ,टायपिंग मशीन, मोबाईल पार्ट्स, व इतर मोठी साहित्य ज्यामध्ये केबल वायर आणि प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. यांच्या उपयोग करून व्यवसाय करतात.आनी एकदा ते उपकरण खराब झाले की इतरत्र मिळेल त्या ठिकाणी फेकून देतात किंवा त्या मोठ्या प्लास्टिकला आणि वायरला जाळून टाकतात. इतरत्र फेकल्यामुळे पावसाचे पाणी जाड प्लास्टिक मध्ये अडकून जमिनीत मुरत नाही. तसेच डबक्यात जमा झाल्यामुळे त्यामध्ये डासांची उत्पत्ती होतो आणि रोगराई पसरतो. सोबतच अनेक उपकरणे आणि साहित्य जाळले जातात त्यामुळे वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढतो. या सर्व प्रदूषणाला थांबविण्यासाठी अर्जुनी मोर नगरपंचायत क्षेत्रातील अशी निकामी आणि वाया झालेली साहित्य वस्तू ज्यांना ई-कचरा म्हटले जातो ते दुकानदाराने इतरत्र कुठेही न फेकता व त्याला न जाळता नगरपंचायत ब्रँड अँबेसेडर अश्विनसिंह गौतम यांना सुपूर्त करण्याचे आवाहन करण्यात आले होते. जेणेकरून जमा झालेला ई-कचरा कुठेही न फेकता न जाळता योग्य प्रोसेस करिता योग्य ठिकाणी पाठविता येईल आणि ई -कचऱ्यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर आळा घालता येईल. यासाठी नगरातील अनेक दुकानदारांनी संपर्क साधून जमा झालेला ईकचरा इतरत्र न फेकता नगरपंचायत स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा विभागाला सुपूर्त केले आणि नगरपंचायत तर्फे त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. या अभियानामध्ये ई-कचरा संकलन करण्याकरिता नगरातील मयूर झेरॉक्स प्रतिष्ठानचे संचालक अजयसिंह पवार यांचे विशेष योगदान लाभले सहकार्य करणाऱ्या दुकानदार यांचे नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे ,नगरसेवक व बांधकाम सभापती राधेश्याम भेंडारकर ,नगर पंचायत मुख्याधिकारी राजू घोडके,प्रशासकीय अधिकारी स्वच्छता प्रमुख अमोल जाधव,को ऑर्डीनेटर निमिष मुरकुटे,स्वच्छता सर्वेक्षण “माझी वसुंधरा” ब्रॅण्ड अंबेसेडर अश्विनसिह गौतम यांनी त्यांचे अभिनंदन केले.