वाशिम,दि.१ ऑगस्ट – महाराष्ट्र राज्यात आरोग्य सेवेच्या रँकिंगमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक यांनी क्रमांक दोन व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी क्रमांक सात प्राप्त केला आहे. मागील वर्षभराची ही आरोग्य सेवेची सर्वोत्तम कामगिरी आहे. या उत्तम कामगिरीसाठी आरोग्य सेवा अकोला मंडळ अकोला उपसंचालक डॉ.कमलेश भंडारी यांनी वाशिमच्या गुणवत्तापूर्ण व सातत्यपूर्ण आरोग्य सेवेच्या उत्तम कामगिरीची दखल घेऊन नुकतेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस. ठोंबरे यांचा सत्कार केला. ग्रामीण भागातील जनतेला उत्तम उत्तम आरोग्यसेवा प्रदान केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यापुढे देखील गुणवत्ता व सातत्यपूर्ण सेवेवर भर राहणार असल्याचा मनोदय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ठोंबरे यांनी व्यक्त केला तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . कावरखे यांनी देखील अधिकाधिक प्रभावीपणे आरोग्यसेवा सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध असल्याचा मनोदय व्यक्त केला.