जिल्ह्यात ओबीसी चळवळ रुजविण्यात सहभागी ओबीसी शिलेदारांचा सत्कार  

0
317
मंडल यात्रा समारोप कार्यक्रमाल प्रसिध्द विचारवंंत प्रा.लक्ष्मण यादव गोंदिया

गोंदिया,दि०२- दरवर्षीप्रमाणे नागपूर येथून निघत असलेल्या मंडल यात्रेचा समारोप  येत्या ७ आॅगस्ट २०२४ रोजी गोंदियाच्या ग्रीन लॅंड लाॅन बालाघाट टी पॅाईंट गोंदिया येथे होणार आहे.त्यानिमित्ताने ओबीसी,व्हीजेएनटी, एसस्सी,एसटी,मायनारिटी समाजाकरीता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात तत्कालीन भंडारा जिल्हा असताना जून १९९८ मध्ये ओबीसी संघटनेच्या सुरवातीच्या काळात चळवळीत सहभागी होत गावखेड्यापर्यंत ओबीसी संघटना व विचार पोचविणार्यामध्ये पुढे असलेल्या ओबीसी शिलेदारांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.या सत्कारमुर्ती मध्ये विनोद चव्हाण बोथली,रमेश ब्राम्हणकर गोंदिया,माधवराव फुंडे नोनीटोला,कृष्णा बहेकार आसोली,चौकलाल येडे चांगोटोला,उमाशंकर ठाकूर चुलोद,एकनाथ साठवणे झांजिया, उध्दव मेहंदळे इटखेडा,प्रेम साठवणे ठाणा यांचा समावेश असल्याची माहीती ओबीसी अधिकार मंचचे सयोंजक खेमेंद्र कटरे यांनी दिली आहे.
 मंडल यात्रा जनजागृती कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघ गोंदिया जिल्हाध्यक्ष प्रा.बी.एम.करमकर राहणार आहेत.तर मुख्य वक्ते म्हणूनओबीसी बहुजन विचारवंत नवी दिल्ली विद्यापाीठाचे  प्रा.लक्ष्मण यादव तसेच ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष इंजि.प्रदिप ढोबळे उपस्थित राहणार आहेत.यात्रेचे नेतृत्व ओबीसी युवा अधिकार मंचचे सयोंजक उमेश कोर्राम हे करीत आहेत.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाजबांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन खेमेंद्र कटरे,अशोक लंजे,सुनिल तरोणे,कैलास भेलावे,सावन कटरे,विनायक येडेवार,भुमेश शेंडे,दिनेश हुकरे,हरिष ब्राम्हणकर,राजीव ठकरेले,सुनिल पटले,उमेश कटरे,अतुल सतदेवे,मोहसीन खान,प्रा.सविता बेदरकर,मालती किन्नाके,रोशन मडामे,तिर्थराज उके,रवि अंबुले,लिलाधर पाथोडे,संंदिप तिडके,किशोर बावनकर, किशोर डोंगरवार,हरिराम येलणे,राहुल येल्ले,राजेश चांदेवार,राजेश नागरीकर,भुमेश ठाकरे, आर.आर.अगडे, विष्णु नागरीकर,कमल हटवार,रामभगत पाचे,सी.पी.बिसेन,प्रमोदकुमार बघेले,वशिष्ट खोब्रागडे,परेश दुरुगकर,सुरेश परशुरामकर,जनार्दन बांते यांच्यासह सर्व ओबीसी एसस्सी,एसटी समाज संघटनेच्यावतीने करण्यत आले आहे.