तिरोडा:– मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे स्त्री पुरुष समानता साध्य करणे आणि सर्व महिला आणि मुलींना सक्षम करणे हे शाश्वत विकास ध्येयांपैकी एक ध्येय आहे. महिलांना आर्थिक, सामाजिक आणि राजकीय उपक्रमांत संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध धोरणे, कार्यक्रम आणि योजना राबवण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक लाभार्थ्याना मिळावा तसेच ज्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे अशा लाभार्थ्यांचे अर्ज भरून लाभ मिळवून देण्याकरिता जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय ग्रामपंचायतमध्ये तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी दौरे सुरु केले आहेत यामध्ये आमदार महोदयांसोबत त्रुटी पूर्तता करण्याकरिता ऑपरेटरची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे सोबतच मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती देण्यात येत असून पात्र लाभार्थ्यान लाभ मिळण्याकरिता आनलाईन अर्ज करणे सुरु झाले आहे या दौ-यामध्ये प्रामुख्याने भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे,प.स.सभापती कुंता पटले, जी.प.सदस्य पवन पटले, एड.माधुरी रहांगडाले, तुमेश्वरी बघेले, कृउबास सभापती जितेंद्र रहांगडाले,चत्रभुज बिसेन,रजनी सोयाम, प.स.सदस्य तेजराम चव्हाण,दिपाली टेंभेकर, मा.प.उपसभापती वंसत भगत, ब्रिजलाल रहांगडाले, प्रकाश भोंगाडे,रवी मुटकूरे,व सर्व ग्रामपंचायतीतील ग्रा.प.सरपंच,उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, ग्रामरोजगार सेवक, संगणक चालक, आशा सेविका, आंगणवाडी सेविका व लाभार्थी उपस्थित होते.