मौदा येथे मंडल दिन साजरा

0
28

मौदा,दि.१४ः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,मौदा च्यावतीने मंडल दिन कार्यक्रम भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचून साजरा कण्यात आला.याप्रसंगी अशोक गजभिये यांनी मंडल आयोगावर प्रकाश टाकत मंडल आयोगाचा संघर्ष व इतिहास उलगडला.
जगदिश वाडिभस्मे यांनी संविधान पूर्णपणे लागू झाल्यास भारत पुन्हा “सोने की चिडीया” होईल आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने भारत विश्वगुरु व आत्मनिर्भर होईल.मंडल आयोग पूर्णपणे लागू झाला पाहिजे, क्रिमिलेयर बंद झाली पाहिजे, जातीनिहाय जनगणना करून ओबीसींना संख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले पाहिजे असे मत व्यक्त केले.
तर डॉ.राजेश पवार – यांनी आमचा शत्रू कोण व मित्र कोण?,तसेच वर्तमानात आमच्या सोबत कशी धोकेबाजी होत आहे आणि आरक्षणा वरून शासक वर्ग कशाप्रकारे आमच्यात झगडे लावत आहेत हे लक्षात आणून दिले.

सभेच्या अध्यक्षा म्हणून किर्तीमाला जयस्वाल उपस्थित होत्या.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ताराचंद इंगळे, भाऊराव धनजोडे,प्रभाकरराव घंटा, ईश्वर डहाके,चेतन वानखेडे, रवींद्र ठाकरे, सचिन तिघरे, मारोती हावरे,श्याम धकाते,रूपेश खोपे,रवींद्र गजभिये,अनिल रंगारी,रविंद्र लोले, रूपेश गवळी उपस्थित होते.संचालन मनोहर कापसे तर आभार संजय कानतोडे यांनी मानले.