19 वर्षांपासून फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; शहर पोलिसांची कारवाई

0
322

गोंदिया : न्यायालय परिसरातून फरार झालेल्या आरोपीला तब्बल 19 वर्षांनंतर पकडण्यात गोंदिया शहर पोलिसांना यश मिळाले असून त्याला भंडारा रोड रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेण्यात आले. राजकुमार ऊर्फ विक्की दिपक बन्सोड (वय 39 वर्ष, रा. गांधी वार्ड, गोंदिया) असे अटक करण्यात आलेला फरार आरोपीचे नाव आहे. गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी गोंदिया जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अभिलेखावरील फरार आरोपींचा शोध घेवुन अटक करण्याचे निर्देश सर्व ठाणेदारांना दिले आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील फरार आरोपींची शोध मोहीम राबविण्यात येत आहे. गोंदिया शहर पोलीस ठाणेतील पोलीस पथक पो. ठाणे अभिलेखावरील फरार आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे फरार आरोपी राजकुमार ऊर्फ विक्की दिपक बन्सोड (वय 39 वर्ष, रा. गांधी वार्ड, गोंदिया) यास तब्बल 19 वर्षानंतर 11 ऑगस्ट 2024 रोजी भंडारा रोड रेल्वे स्टेशन येथुन ताब्यात घेवुन अटक करण्यात आले. मा. न्यायालयाचे आदेशाने नमुद आरोपीस जिल्हा कारागृह, भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे. तब्बल 19 वर्षापासुन फरार नमूद आरोपी हा पोलीस ठाणे गोंदिया शहर दाखल अपराध क्रमांक- 154/2005 कलम 224 भादंवि गुन्हयातील फरार आरोपी असून तो 26 ऑगस्ट 2005 रोजी मा.उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी गोंदिया यांचे न्यायालय परिसरातुन पळून गेलेला होता. गोंदिया शहर पोलीस त्याच्या शोधात होते. अखेर शहर पोलीसांनी त्यास तब्बल 19 वर्षानंतर जेरबंद करून यश प्राप्त केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीनी बानकर, गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. किशोर पर्वते, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथक स. फौ. राजकुमार बिडकर, पोशि. सुरेश चौधरी, कमलेश बोरकर, रमेश कळाम, राहुल रामटेके, मपोशि सोनाली भालाधरे यांनी केली आहे.