गोंदिया,दि.२४: ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर व मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे. या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब आहे, असा आरोप काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी केला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देखील ट्विट करून बदलापूर घटनेचा निषेध केला आहे. महाविकास आघाडीने २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. उच्च न्यायालयाने राजकीय पक्षचा बंद बेकायदेशीर ठरवल्याने बंदचे रुपांतर मूक आंदोलनात करण्यात आले आहे.महात्मा गाधी यांच्या प्रतिमेसमोरुन निघालेला हा मुक मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने भ्रमणकरीत प्रशासकीय इमारत कार्यालय येथे पोचला,तिथे निवेदन देऊन आरोपीवर कारवाईची मागणी करण्यात आली.
बदलापूरच्या घटनेत पोलीसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रार दाखल करण्यास गेलेल्या पीडित मुलीच्या आईला तासनसात पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. पोलीस यंत्रणेसोबतच राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे. काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष दिलीप बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले.देवरी-आमगावचे आमदार सहसराम कोरेटे,माजी आमदार व शिवसेना नेते रमेश कुथे,प्रदेश काँग्रेससचिव अमर वर्हाडे,शिवसेना जिल्हाध्यक्ष पकंज यादव,जितेश राणे,शरद पवार राष्ट्रवादी काँग्रसचे सौरभ रोकडे,अशोक गुप्ता,राजू कुथे,पप्पू पटले,अरुण गजभिये,रमेश अंबुले,जहिर अहमद,राजू काळे,वंदना काळे,योगेश अग्रवाल,निलम हलमारे,जितेंद्र बोरांडे, तसेच अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गुन्हेगारांना साथ देणाऱ्या महायुती सरकारचा निषेध करत आहे. राज्यात गुन्हेगारीची टक्केवारी वाढली आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. लहान मुलींचे शोषण होत आहे. बदलापूरचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. उच्च न्यायालयाने थोबाड लाल केल्यावर कारवाई होते. यातून सरकारची विकृत मानसिकता दिसते. या विकृत सरकारचा निषेध करून दोषींना त्वरित फाशी द्यावी. यासाठी आमचे मूक आंदोलन आहे, असे आमदार सहसराम कोरेटे यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडीच्या वतीने सडक अर्जुनी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यर्पण करून बदलापूर येथील घटनेचा काळे फीत बांधून निषेध करण्यात आला. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी दामोदर नेवारे, राजु हेडावू जिल्हा संघटक शिवसेना शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा उपप्रमुख राजु पटले,मनोज रामटेके, राजेश नंदागवळी, किशोर शेंडे, दिनेश हुकरे, निशांत राऊत, आशिष येरने, महेश डुभंरे,विरु गौर, रोशन बडोले, स्वप्नील ब्राम्हणकर, शंकर मेंढे, संतोष लाडे ,राजेंद्र जनबंधु, नाशिर पटेल, हरीश कोहळे, नंदकिशोर डोंगरवार ,पुष्पा खोटेले ,मंजू डोंगरवार, प्रा. रिता लांजेवार, धनवंता गभने, लीना राऊत महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.