ठाकरे गटाच्या वतीने कुडाळात १ लाखाची दहीहंडी…

0
10

कुडाळ:-आमदार वैभव नाईक पुरस्कृत शिवसेना ठाकरे गट युवा सेना यांच्या वतीने २७ ऑगस्टला १ लाखाच्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने द रॉकरर्स बॉलीवूड बॅंडचा आर्केट्रा तसेच महिलांसाठी खास कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती युवा सेना उपजिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

श्री. शिरसाट पुढे म्हणाले, आमदार वैभव नाईक पुरस्कृत ही मानाची लाख मोलाची निष्ठेची दही हंडी असून त्याचे बक्षिस १ लाख रुपये आहे. २७ ऑगस्टला जिजामाता चौक येथे संध्याकाळी ५ वाजता या उत्सवाचा शुभारंभ होणार आहे. या निमित्ताने संध्या ६ वाजल्यापासून द रॉकरर्स बॉलीवूड बॅंडचा आर्केट्रा, महिलांसाठी खास कार्यक्रम, असे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या दहीहंडी उत्सवात नामांकित गोविंदा पथके सहभागी होणार असून सहभागी संघास २५०० रुपये देण्यात येतील. तसेच ४ थर लावणाऱ्या पथकाला ४ हजार , ५ थरसाठी ५ हजार, ६ थरासाठी ६ हजार , ७ थरासाठी ७ हजार , ८ थरासाठी ८ हजार अशी पारितोषिके आहेत. अधिक माहितीसाठी गोट्या चव्हाण ९६७३०११८७६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी मंदार शिरसाट यांच्यासह उदय मांजरेकर, संतोष शिरसाट, गोट्या चव्हाण, संदीप म्हाडेश्वर, आदी उपस्थित होते.