वाशिम ,दि.२७ ऑगस्ट – २५ ऑगष्ट ते ८ सप्टेंबर २०२४ दरम्यान राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत जिल्हयात ३९ वा नेत्रदान पंधरवाडा साजरा होत असुन २५ ऑगष्ट पासुन प्रारंभ झालेल्या या पंधरवाडयानिमीत्त नेत्रदाना बाबत जनजागृतीच्या हेतुने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल कावरखे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित रुग्ण व नातेवाईकांना तसेच रुग्णालयीन कर्मचा-यांना नेत्रदान पंधरवाड्यानिमीत्त नेत्रदानाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. दिनांक २६ ऑगस्ट रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करुन त्यामध्ये १२० नेत्र रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली तसेच २० रुग्णांची मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आली. सदर शिबीरात नेत्रदान महादान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संचालन नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे यांनी केले. नेत्रदानाबाबत सविस्तर मार्गदर्शन नेत्रशल्य चिकीत्सक डॉ. बेदरकर यांनी केले. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयात नेत्रदान चळवळीचे रोप हे वटवृक्षाचा आकार घेत आहे. त्यामुळे अंधत्वाचे प्रमाण कमी करण्याच्या हेतुने व नेत्रदान चळवळ अधिक वृध्दिगत करण्यासाठी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत नेत्रदान पंधरवाडा साजरा करण्यात येत असल्याची माहीती दिली. नेत्र बुब्बुळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असुन उपलब्धता कमी प्रमाणात असल्याने अंधत्वाचे प्रमाणही वाढले आहे. सदर कॉर्नियल ब्लाईन्ड अंधव्यक्तीमुळे कुटुंबावर पर्यायाने देशाच्या प्रगतीवर विपरीत परीणाम होतांना दिसत आहे. त्यामुळे जनमानसात नेत्रदानाबाबत जन जागृती करुण जास्तीत जास्त लोकांचे मरणोत्तर नेत्रदान घडवुन आणने व कॉर्नियल ब्लाईन्डमुळे होणारे अंधत्व टाळणे हा मुळ उददेश असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल कावरखे यांनी सांगीतले.
उपस्थितांचे आभार रवि घुगे यांनी मानले. याप्रसंगी रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अविनाश पूरी, नेत्र चिकित्सा अधिकारी ज्ञानेश्वर पोटफोडे, सुधिर साळवे, गणेश व्यवहारे, नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे, लेखापाल ओम राउत, व इतर कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर, रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने हजर होते.