मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त आज जिल्ह्यात

0
104

 गोंदिया, दि.29 : भारत निवडणूक आयोगाचे 21 जून 2024 चे पत्रान्वये दिनांक 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला असून भारत निवडणूक आयोगाचे 26 जून 2024 चे पत्रानुसार विभागीय आयुक्त नागपूर विभाग, नागपूर यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

        दिनांक 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी तपासणीच्या अनुषंगाने मतदार यादी निरीक्षक म्हणून भेट द्यावयाच्या असल्याने 29 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.45 वाजता तृतीय भेटीबाबत मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त नागपूर विभाग, नागपूर विजयलक्ष्मी बिदरी ह्या गों‍दिया जिल्ह्यात येणार आहेत. मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त नागपूर विभाग, नागपूर विजयलक्ष्मी बिदरी यांचा भ्रमणध्वनी क्र. 8983019814 हा सर्व जनतेसाठी कळविण्यात येत आहे.

         मतदार यादी तपासणीच्या अनुषंगाने 29 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे सकाळी 11.45 वाजता मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त नागपूर विभाग, नागपूर विजयलक्ष्मी बिदरी ह्या तृतीय भेटीबाबत आढावा घेणार असून बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, खासदार, आमदार, मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार उपस्थित राहणार आहेत. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण अंबेकर यांनी कळविले आहे.