देसाईगंज दि.३- देसाईगंज शहरातील माता वार्डातील श्री गजानन महाराज मंदिरात मागील पन्नास वर्षांपासून सुरू असलेल्या तान्हा पोळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. याप्रसंगी गजानन महाराज संस्थानचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी मनोहरजी भुरे, राजेश जेठानी, ,सचिन वानखेडे , शाम उईके माजी नगराध्यक्ष ,कृष्णा भांडारकर, मोतीलाल कुकरेजा, विलास लोखंडे, अनिल फडणवीस, सुधाकर राऊत, डॉ विष्णू वैरागडे,नानू मेश्राम, बाळकृष्ण राऊत,आशिष मंगर, प्रकाश वानखेडे, गजानन भुरे, खुशाल दोनाडकर, सचिन मशाखेत्री, मनोज भुरे, हेमंत गजघाटे, संगम शेंडे, चेतन डाबरे, अमोल पत्रे, जितु भाऊ बेहरे, गोलू खेडीकर, योगेश ठाकरे, योगेश शिऊकर विनू गजपूरे, अंकुश नंदागवळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आयोजकांनी नंदीबैल घेऊन उपस्थित असलेल्या बालगोपालांना खाऊ व नोटबुक दिले.