ट्रॅकटरवर बसलेला व्हिडीओ स्टंटबाजी नसून पूरग्रस्त गावात जाण्याकरिता होता.- आ. विजय रहांगडाले

0
410

तिरोडा:- दिनांक ०९ सप्टेंबर २०२४ रोज सोमवारला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर आल्याने मोठ्या प्रमाणात नदीकाठी वसलेल्या गावाला पुराने वेढले असल्यामुळे पूरग्रस्त भागात घरांचे व धानपिकांचे नुकसान झाले होते व नागरीकांचा संपर्क तुटलेला होता या दरम्यान नागरिकांना नुकसानभरपाई मिळावी याकरिता आमदार महोदयांनी तातडीने पंचनामे करण्याबाबत जिल्हाधिकारी गोंदिया यांना पत्राद्वारे सूचित केले व पूरबाधित गावाचे पंचनामे करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना आदेशसुधा देण्यात आले होते दरम्यान तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा या गावाला चारही बाजूने पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे गावाचा संपर्क तुटलेला होता या गावी आमदार महोदय उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांचेसोबत पूरपरीस्थितीची पाहणी करण्याकरिता गेले असता घाटकुरोडा येथे जाण्याकरिता घोगरा तसेच चांदोरी बूज. येथील नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे घाटकुरोडा येथे जावू शकले नाही याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क केला असता बोट महालगाव मुरदाडा या भागात असल्यामुळे वेळेवर बोट उपलब्ध होऊ शकली नाही यामुळे घाटकुरोडा येथून ट्रॅकटरची व्यवस्था करण्यात आली व त्यावर बसून आमदार महोदय, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, व कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घाटकुरोडा येथे गेले व संपूर्ण गावाची पाहणी केली या पाहणी दरम्यान त्याच्या सोशल मिडीयावर पूरग्रस्त भागाची पाहणीचे व्हिडीओ व फोटो सोशल मिडीयावर अपलोड करण्यात आले त्यांच्या पूरग्रस्त गावातील घाटकुरोडा येथील नाल्यावरील जात असतानाची व्हिडीओ क्लिप मिडिया न्यूज वर दाखवून खासदारांनतर आमदारांची स्टंटबाजी असे प्रसारित करण्यात आले वास्तविक सोशल मिडिया न्यूजकडून आमदार महोदयांकडून याबाबतची शहानिशा करणे गरजेचे होते परंतु तसे न करता दोन दिवसाआधी भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या कारवरील बोनटवर बसताणाचा व्हिडीओशी जोडून तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले व अधिकारी यांचा पूर पाहणीचा व्हिडीओ स्टंटबाजी करीत असल्याबाबत व्हायरल करण्यात आलेला असून सदर व्हिडीओ स्टंटबाजी नसून घाटकुरोडा येथे अधिका-यांसोबत जाण्याचा असल्याचा दावा आमदार यांनी केला आहे.