ओबीसी विद्यार्थ्यांनी संविधान चौकात केला एकदिवसीय उपोषण आंदोलन
नागपूर,दि.२२ः- संपूर्ण महाराष्ट्रात 72 ओबीसी वसतिगृहे सुरू करू अशी घोषणा मागील अनेक वर्षांपासून शासनाकडून होत आहे. परंतु ओबीसी वसतिगृहे सुरू न झाल्याने अनेक ओबीसी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित आहेत.त्यामुळे आज रविवारला ओबीसी विद्यार्थ्यांनी संविधान चौकात एकदिवसीय उपोषण आंदोलन करुन येत्या १ १ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाचा इशारा राज्यसरकारला दिला आहे.
मागील सत्रात 15 ऑगस्ट 2023 पासून वसतिगृहे सुरू करू अशी घोषणा मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांनी केली होती. तेव्हापासून आजपर्यंत 10 वेळा ओबीसी विभागाने तारखा दिल्या,परंतु वसतिगृहे सुरू झाली नाहीत. ओबीसी समाजाच्या विविध न्यायिक मागण्यांवर शासन उदासीन आहे. शासन ओबीसी समजासोबत दूजाभाव करत आहे.
यासाठी विद्यार्थ्यांनी अनेकवेळा आंदोलने केलीत परंतु आंदोलनाचा काहीएक बोध शासनाने घेतला नसल्याने दिसून येत आहे.शासन ओबीसी समाजाच्या प्रश्नावर गंभीर नाही.म्हणून विद्यार्थ्यांनी आता आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.तसेच ओबीसी विद्यार्थ्यांची प्री मॅट्रीक शिष्यवृत्तीचे ७५० कोटी रुपये देण्यात यावे.इतर मागासबहुजन कल्याण विभागाचे अधिकारी राजेंद्र भुजाडे यांचे निलबंन रद्द करण्यात यावे.महाज्योती संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पीएचडीकरीता फेलोशिप देण्यात यावे या मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले.
आज रविवारला वसतिगृह आणि PhD fellowship साठी 50 विद्यार्थ्यांनी उपोषण आंदोलन केले. या आंदोलनात ओबीसी युवा अधिकार मंचचे मुख्य संयोजक उमेश कोर्राम,पदवीधर मतदारसंंघाचे आमदार अभिजित वंजारी,राष्ट्रवादी काँगेसचे सलील देशमुख,दुनेश्वर पेठे,ईश्वर बाळबुधे,वंदना वनकर,ओबीसी जनमोर्चाचे रमेश पिसे,युवा ग्राजूएट फोरमचे अतुल खोब्रागडे,पल्लवी आटे, सकल कुणबी समाजाचे राजेश काकडे,संघर्ष वाहिनीचे दीनानाथ वाघमारे,धीरज भिसिकर,ओबीसी युवा अधिकार मंचचे आकाश वैदय,पियुष आकरे,देवेंद्र समर्थ, कृतलआकरे,गोविंद सूर्यवंशी,नयन काळबांडे,पल्लवी समर्थ,जानबा मस्के,रामेश्वर हिंगरूपे,उमेश सोळखे, सूर्यकांत खणके आदी सहभागी झाले होते.