अर्जुनी मोर.-डॉ. भारत लाडे सामाजिक कार्यकर्ता तथा उपाध्यक्ष युवक काँग्रेस गोंदिया जिल्हा ,आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटी सडक अर्जुनी , डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने सौंदड येथे आयोजित केलेल्या नेत्र तपासणी आरोग्य शिबिरामध्ये मोतीबिंदू आणि इतर शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णांना आज दिनांक 22/09/2024 ला जिल्हा प. हायस्कूल सौंदड येथून रुग्णांची बीपी शुगर तपासणी करून डॉ बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटी नागपूर येथे मोफत मोतीबिंदू, हायड्रोसिल, CT Scan, MRI,हर्निया अशा विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी पाठविण्यात आले.
प्रामुख्याने उपस्थित मा. शामराव शिवणकर माजी पंचायत समिती सदस्य,सौ.गायत्रीताई ईरले, रोशन शिवणकर, समाधान बडोले, युनेश भेंडारकर, रेखा राऊत, अर्चना डोंगरवार,योगेश्वरी निर्वाण , व युवा महोत्सवचे सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णांना नागपूर येथे पाठविण्यात आले..