गोंदिया. आपल्या कर्तव्यपूर्ती जनआशीर्वाद यात्रेचा भाग म्हणून निलज येथे 12 कोटी, शिवनी येथे 17 कोटी आणि खमारी येथे 27 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन प्रसंगी क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते अत्याधुनिक, सुसज्ज महिला बचत भवन लाडक्या भगिनींच्या हाती सुपूर्द केले व शुभेच्छा दिल्या.
आमदार अग्रवाल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मला प्रत्येक गावातील महिलांच्या तक्रारी येत होत्या की, गावात महिला बचत भवन नसल्यामुळे त्या इतरांवर अवलंबून राहतात. ही बाब मी गांभीर्याने घेऊन शासन दरबारी मागणी लावून ती मंजूर करून घेण्याचे काम केले.विधानसभा मतदारसंघातील 86 ग्रामपंचायतींपैकी 75 ग्रामपंचायतींमध्ये 25 लाख रुपये खर्चून महिला बचत भवनांना मंजुरी मिळवून देण्यात यश मिळविले असून आज आम्ही महिला बचत भवन आमच्या भगिनींच्या ताब्यात देत आहोत.
राज्यातील हा पहिला प्रयोगशील गोंदिया विधानसभा मतदारसंघ आहे जिथे, महिलांसाठी माझ्या संकल्पामुळे 75 महिला बचत भवन असलेला महाराष्ट्रातील पहिला मतदारसंघ निर्माण झाला आहे. आता या आधुनिक इमारतीत भगिनींना सभा व कार्यक्रम घेता येणार आहेत.महिला शक्ती कशी उन्नत करता येईल यासाठी माझे सातत्याने प्रयत्न आहेत. महिला भवनासोबतच महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर आम्ही लाडली बहिण योजना सुरू केली. आज या योजनेच्या माध्यमातून भगिनींना दरमहा 1500 रुपये देण्याचे काम केले जात आहे.
ते म्हणाले, गोंदिया विधानसभा मतदारसंघ हे राज्यातील पहिले क्षेत्र आहे जेथे १ लाख ५ हजार भगिनी या योजनेच्या लाभार्थी आहेत. मात्र या योजनेपासून भगिनींना वंचित ठेवण्याचे षडयंत्र काही तथाकथित नेते करत आहेत. पण आज हा भाऊ आपल्या बहिणींना वचन देतो की कोणताही नेता आला तरी आम्ही ही योजना बंद पडू देणार नाही. या भगिनीच आगामी निवडणुकीत अशा नेत्यांचे तंबू उखडून टाकतील.
कार्यक्रमादरम्यान पं.स.चे अध्यक्ष मुनेश रहांगडाले, कृउबासचे अध्यक्ष भाऊराव उके, चाबी संघटनेचे तालुकाध्यक्ष छत्रपाल तुरकर, विक्की बघेले, अजित टेंभेरे, राजूभाऊ कटरे, मुरलीधर नागपुरे, शेखर सहारे, जिप सदस्य आनंदा वाढीवा, वैशाली पंधरे, ललित चौधरी, एड नागपुरे यांच्यासह इतर संगठन पदाधिकारी, गावातील भगिनी व नागरिक उपस्थित होते.