8 ऑक्टोबरला पेंशन अदालतचे आयोजन

0
17

 गोंदिया, दि.4 : महालेखाकार कार्यालय नागपूर तसेच जिल्हा कोषागार कार्यालय गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने 8 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4.30 या वेळेत कार्यशाळा व पेंशन अदालत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय यांचे सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मागे, गोंदिया येथे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये आहरण व संवितरण अधिकारी (DDOs) यांचेसाठी E-PPO, E-CPO, E-GPO तसेच महालेखाकार नागपूर यांचेकडून आक्षेपित झालेले निवृत्तीवेतन प्रकरणे हे विषय घेण्यात येतील. तसेच पेंशन अदालतीत निवृत्तीवेतन धारकांसाठी पेंशनर समाधान तसेच निवृत्तीवेतनधारक यांच्या समस्यांचे निराकरण महालेखाकार कार्यालय नागपूर यांचेकडून करण्यात येईल. तरी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी व अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) गोंदिया यांनी केले आहे.