
गोंदिया,दि.०५ः संजोत बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक के.डी.भास्कर यांची जयंती संस्थेचे सचिव संजय भाष्कर यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी श्रीमती शुभा शहारे सहसचिव संज्योत बहुउद्देशीय शिक्षण संस्था व श्रीमती नंदा राऊत मुख्याध्यापिका अक्युट पब्लिक स्कूल गोंदिया, तसेच एकता पटले, मुखाद्यापिका रोझी किड्स कान्वेंट रावणवाडी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला के.डी.भास्कर यांच्या प्रतिमेला माल्यअर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी यांनी के.डी.भास्कर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.त्यानंतर अध्यक्षांनी आपल्या मार्गदर्शनात के डी भास्कर सरानी केलेले कार्य तसेच त्याचा व्यक्तिमत्व बद्दल संगीतले त्यानंतर विद्यार्थ्यांचे तोड़ गोड करण्यात आले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साह पूर्वक सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री बिसेन यांनी केले,तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रोशनी बरेले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता विद्यार्थी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले