गोंदिया,दि.०७ःगोंदिया विधानसभा मतदारसंघात सध्या आजी आमदाराच्यांवतीने प्रत्येक गावात कोट्यावधीच्या निधीतील सिमेंट रस्ते,नाली,महिला भवन आदींचे काम धुमधडाक्यात सुरु आहेत.हे सर्व काम सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ च्यावतीने व महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना व आमदारांचा स्थानिक निधी(अभिसरण योजना)तून कामे सुरु करण्यात आली,मात्र निवडणुकीपुर्वी काम आटोपण्याच्या घाईगडबडीत कुणीही त्या कामात वापरल्या जाणार्या मटेरियलची गुणवत्ता कुणीच बघत नाही.संंबधित यंत्रणा असलेली ग्रामपंचायत तर पुर्णःत आंधळी झाली असून बहुतांश ग्रामपंचायतीचे सरपंच हेच कंत्राटदार आहेत की काय अशी शंका येत आहे.

गोंदिया तालुक्यातील आंभोरा,अर्जुनी,काेचेवाही याठिकाणी सध्या कामे सुरु असून कोचेवाही येथे तर सरपंचाच्या घराशेजारीच एका सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे.त्या रस्ता बांधकामावर सिमेंट क्राँक्रीटचे जे मिश्रण बघावयास मिळाले,त्यावरुन गुणवत्ता नावाची गोष्टच दिसून येत नाही.ज्यांच्या घरासमोर हे काम करण्यात येत आहे,त्यांनी विरोध केल्यानंतरही ग्रामपंचायत एैकत नसल्याचे त्यांचे म्हणने आहे.तर ग्रामपंचायत अर्जुनी येथे ३६ लाख रुपयाच्या निधीतून सिमेंटं रस्ता व नाली बांधकाम करण्यात येत असून ग्रामपंचायत कार्यालयासमोरली एका गल्लीत सिमेंंट रस्ता तयार करण्याकरीता जे सिमेंट क्राँक्रीटचे मिश्रण वापरण्यात आले,त्याची गुणवत्ता सुध्दा तपासण्यायोग्य असून सार्वजनिक बांधकाम विभाग क्रं.१ अंतर्गत येत असलेल्या गोंदिया उपविभागाच्या अभियंत्याचे व शाखा अभियंत्याचे या कामाकडे पुर्णःत दुर्लक्ष झाल्याने तयार होत असलेल्या सिमेंट रस्ता अवघ्या १ महिन्याच्या आत वापरण्यात आलेल्या गिट्टीसह बघावयास मिळेल असे नागरिकांचे म्हणने आहे.