तिरोडा,दि.०७:- तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी शासनाकडून नागरी क्षेत्रात १०.०० कोटी व ग्रामीण क्षेत्रातील रस्ते व सामाजिक सभागृह बांधकामाकरिता ६.०० कोटी रुपये मंजूर करवून घेतला असून यापैकी १कोटी १५ लक्ष रुपये विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले. यामध्ये प्रामुख्याने न.प.तिरोडा येथेगिरजाबाई शाळेजवळ सामाजिक सभागृह बांधकाम ३०.०० लक्ष, स्वच्छतागृह बांधकाम १०.०० लक्ष, माजी सैनिक सभागृह येथे सभा गृह बांधकाम ३०.०० लक्ष, सरक्षणभिंत बांधकाम १०.०० लक्ष, बयवाडा येथे सिमेंट रस्ता ५.०० लक्ष, केसलवाडा येथे सभामंडप बांधकाम २०.०० लक्ष, सिल्ली येथे सभामंडप ५.०० लक्ष, सीतेपार येथे सभामंडप बांधकाम ५.०० लक्ष या कामांचा समावेश असून आमदार विजय रहांगडाले याच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जितेंद्र रहांगडाले,न.प.बांधकाम मा.सभापती अशोक असाटी,जी.प.सदस्या रजनी कुंभरे,चत्रभूज बिसेन, प.स.सदस्य तेजराम चव्हाण, डॉ.चेतलाल भगत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रविंद्र वहिले, दीपक कुकडे व संबधीत गावातील सरपंच, ग्रा.प.सदस्य व गावकरी उपस्थित होते.