भारतीय संस्कृती जपणारा आगळावेगळा गरबा उत्सव वृक्षसंवर्धनासह महिला अत्याचाराविरोधात उठविला आवाज

0
432

गोंदिया, ता. ११ ः दिवसेंदिवस वाढत्या सामाजिक बदलामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, हे असेच राहिले तर भविष्यात गंभीर समस्यांचा सामना
आपल्याला करावा लागेल, याकरिता येथील महिलांच्या हक्काचे व्यासपीठ समजल्या जाणाऱ्या ‘सुपर वुमन’ने एक आगळ्या वेगळ्या ग्रीन दांडिया एव्हरग्रीन महाराष्ट्र गरबा उत्सवाचे
आयोजन येथील परमाका ग्राऊंड येथे केले. ‘सुपर वुमन’ने नेहमीच आपल्या नाविण्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून गोंदियावासींचे लक्ष वेधले. ५ ते ९ आॅक्टोबर असे पाच दिवस
चाललेल्या गरबा उत्सवामध्ये वृक्ष संवर्धनासह महिलांवर होणारे अत्याचार कमी व्हावे, याकरीता शासनाने कठोर कायदे आणून महिलांना सुरक्षेची हमी द्यावी, या आशयाच्या संदेशासह
भारतीय संस्कृती जपत एक आगळ्या वेगळ्या गरबा उत्सवाचे आयोजन संचालिका प्राची प्रमोद गुडधे यांनी केले.
यावेळी पाचशेच्या वर महिलांनी गरबा करत देवेची आराधना केली.
या
उत्सवादरम्यान महिला सुरक्षिततेविषयी जनजागृती करून तायक्वांदोचे प्रशिक्षक दुलीचंद मेश्राम यांच्या टीमने प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून आत्मरक्षणाचे धडे दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परमाका एजन् चे संचालक संजय अग्रवाल, रामायना हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉ.ओम बघेले,डॉ.निशांत करवडे, लावण्या एज्युकेशनचे संचालक गजेंद्र फुंडे, पंजाब
नॅशनल बँकेचे शाखा व्यवस्थापक कुलदीप दोनोडे, प्रदीप डोंगरे, कैलाश पटले, किशोर पटले, नरेंद्र दियेवार, विजय जयस्वाल, सुपर वूमनच्या जिल्हा संयोजिका संध्या डोंगरवार, मनीषा
महेशगवळी, समीक्षा पटले, सुनीता ठाकूर, मीना टेंभरे, शिखा लिल्हारे, नीतू पाराशर, वोपाली वैद्य, सुषमा आमकर, याशिका धामडे, हर्षा माईंदे, सुषमा पिल्लारे, नितू शेंडे, शरद देव्हारे,
गुणेश्वर बिजेवार यांच्यासह ‘सुपर वूमन’च्या चमूने सहकार्य केले.
………………………….