
अर्जुनी मोर. -)राष्ट्रपिता महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरत आहे.ही योजना सुरळीत चालण्यासाठी गावस्तरावर ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आली.गेल्या 17 वर्षापासून रोजगार सेवकांना गावात झालेल्या कामाच्या निधीतुन तुटपुंजा कमिशन मिळत असे.अशा परिस्थीतीत कुटुंबाचा गाडा चालविने रोजगार सेवकांना तारेवरची कसरत होती.मात्र सध्याचे महायुतीच्या सरकारनी रोजगार सेवकांच्या विविध मागण्या मान्य करुन आठ हजार रुपये मासिक मानधन जाहीर केल्याने रोजगार सेवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तसेच रोजगार सेवकांना नव्या ताकदीने कामे करण्याची उर्जा प्राप्त झाली आहे. शासनाचे या निर्णयामुळे गावविकासाला ही नवी चालना मिळणार आहे. असे प्रतिपादन माजी सामाजीक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
अर्जुनी मोर तालुका रोजगार सेवक संघटनेने आयोजित केलेल्या शासनाचे आभार व महायुती सरकार मधील पदाधिकारी यांचे सत्कार प्रसंगी ता.10 पंचायत समिती सभागृहात राजकुमार बडोले बोलत होते.या कार्यक्रमाला आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी मंत्री राजकुमार बडोले, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र नायडु, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजीत पवार गटाचे युवा नेते व हक्काचे माणुस म्हणुन परिचीत असलेले डाॅ. सुगत चंद्रिकापुरे, शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष जगदीश चितलांगे,पंचायत समिती उपसभापती होमराज पुस्तोळे, पं.स.सदस्य नाजुक कुंभरे, नुतनलाल सोनवाने, राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, रोजगार सेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष रोकडे, अरुणनगरच्या सरपंच मिताली किर्तृनिया, उपसरपंच भगवान गायकवाड, व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम राष्टपिता महात्मा गांधी यांचे प्रतिमेला माल्यार्पण व दिपप्रज्वलीत करुन तथा फटाक्याची आतीशबाजीने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. तसेच उपस्थित लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना पेढा भरवुन सर्व पदाधिका-यांचा शाल श्रीफळ देवुन सत्कार व अभिनंदन करण्यात आला. प्रास्ताविकातुन संतोष रोकडे यांनी ग्रामरोजगार सेवक व संघटनेच्या लढ्याविषयी माहीती देवुन 17 वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर महायुती सरकारच्या दमदार निर्णयाची माहीती देताना आम्हाला ख-या अर्थाने न्याय मिळाला असुन शासनाचे आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती दिली.
यावेळी डाॅ. सुगत चंद्रिकापुरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा नारा दिला. हा नाराच ग्रामरोजगार सेवकांना कामी आला आहे. पहिल्यांदा आपन शिकले त्यामुळे रोजगार सेवक झाले,त्यानंतर संघटीत होवुन संघटना तयार केली.आणी तब्बल 17 वर्ष आपन संघर्ष केले.त्याचे फलीत म्हणुन युती सरकारनी आपल्या सर्व मागण्या मंजुर केल्या.हा आपल्या एकतेचा व संघर्षाचा विजय असल्याचे सांगितले.
रोजगार सेवकांसाठी सुगत चंद्रिकापुरे ठरले देवदुत
अर्जुनी मोर. विधानसभेसाठी डाॅ.सुगत चंद्रिकापुरे हे युवा नेते म्हणुन पुढे येत.आहेत.सामाजीक कार्याची आवड असलेले डाॅ सुगत चंद्रिकापुरे अनेकांच्या मदतीला धावून जातात.रोजगार सेवकांच्या मदतीसाठी त्यांनी मोठे प्रयत्न केल्याचे संघटनेचे अध्यक्ष संतोष रोखडे यांनी सांगितले. महायुती सरकारचे आभार मानण्यासाठी मुंबई ला गेलेल्या अर्जुनी मोर तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या पदाधिकारी यांची संपुर्ण व्यवस्था करुन आपल्या मानवतेचा परिचय करून दिला. त्यामुळे संघटनेच्या वतीने सुगत चंद्रिकापुरे यांचा शाल श्रीफळ देवुन सत्कार व अभिनंदन करण्यात आला.