= चापटी व पिंपळगाव येथे बुध्द मुर्तीचे अनावरण =
अर्जुनी मोर.–डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व धर्मांचा सखोल अभ्यास केला.व शेवटी अखिल मानव जातीचे कल्याण असलेला तथागत बुध्दाचा धम्म अंगीकारला.व 14 ऑक्टोबर 1956 ला नागपुरच्या ऐतिहासिक दिक्षाभुमीवर आपल्या लाखो बांधवांना बौध्द धम्माची दिक्षा दिली.बुध्दाचा धम्म जगात पोहचविण्याचे महान कार्य सम्राट अशोकानी केले.जगात कुठेही गेले तरी बुध्दाचे विचारच दिसुन येतात.बुध्दाचे विचार शांतीचे प्रगतीचे व मानवतेचे आहेत.असे मौलीक विचार आंबेडकरी विचारांच्या कवियत्री शारदाताई राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
अर्जुनी मोर. तालुक्यातील चापटी व पिंपळगाव येथे राजकुमार बडोले फाउंडेशन च्या वतीने दान करण्यात आलेल्या भगवान बुध्द व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तींचे अनावरण शारदाताई बडोले यांचे हस्ते ता.14 ऑक्टोबर ला करण्यात आले.त्यावेळी त्या बोलत होत्या.तालुक्यातील चापटी,पिंपळगाव बाराभाटी,व बोंडगांवदेवी येथे 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाला शारदाताई राजकुमार बडोले यांनी भेट दिली.व धम्म बांधवांना मार्गदर्शन केले.यावेळी राजकुमार बडोले फाउंडेशन चे प्रशांत शहारे ,बाजार समीतीचे संचालक व्यंकट खोब्रागडे व अन्य पदाधिकारी व गावागावातील बौध्द उपासक, उपासिका मोठ्या संख्येत उपस्थित होते.सर्वप्रथम चापटी व पिंपळगाव येथे पुज्य भंतेजींच्या हस्ते बुध्द पुजापाठ व परित्रण पाठ घेवुन शारदाताई बडोले यांचे हस्ते अनावरण करण्यात आले.
पुढे धम्म बांधवांना मार्गदर्शन करतांना शारदाताई बडोले म्हणाल्या की माजी मंत्री राजकुमार बडोले यांचेवर भगवान बुध्द व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांचा मोठा प्रभाव आहे.पुर्वीपासुनच सामाजीक कार्याची ओढ असल्याने हे कार्य अधिक जोमाने करता यावी म्हणून बडोले साहेबांनी राजकारणाच्या माध्यमातुन आपला राजकीय प्रवास सुरु केला व आपल्या मतरुपी आशीर्वादानेच ते अर्जुनी मोर. विधानसभेचे आमदार व दुस-या वेळेस महाराष्ट्राचे सामाजीक न्याय मंत्री झाले.आपल्या कार्यकाळात त्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर लंडन मधे वात्यव्यास होते.ते घर केंद्र व राज्यसरकारच्या माध्यमातुन विकत घेवुन बाबासाहेबांचे विचार जगात पोहचविण्याचे काम बडोले साहेबांच्या हातुन घडले.असे कितीतरी ससामाजीक कार्य करण्याचे सौभाग्य त्यांना लाभले.ही सर्व कामे करण्यासाठी आपन सर्व समाज बांधवांनी दिलेल्या प्रेम व आपुलकी मुळेच शक्य झाले.येणा-या दिवसातही आपनाकडुन असेच आशीर्वाद मिळत राहीले तर समाजाचे काम करण्यासाठी बडोले साहेब अग्रेसर राहतील अशी मी ग्वाही देते असेही शारदाताई बडोले यांनी सांगीतले.सर्व गावातील कार्यक्रमास बौध्द उपासक,उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.