– पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागात वन्यजीव सप्ताह
नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागात ३ ते ७ ऑक्टोबर २०२४ दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. “लोक आणि पृथ्वी यांना जोडणे: वन्यजीव संवर्धनात डिजिटल नवोन्मेषाचा अभ्यास” या थीमधर वन्यजीव सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने वन्यजीव संवर्धनावर आधारित पोस्टर व छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली.
वन्यजीव संवर्धन करण्यास प्रोत्साहन देणे. त्याचप्रमाणे विविध विविध प्रजातींना समोर येणारी आव्हाने याची माहिती देणे आणि संवर्धन कार्यात समाजाची सहभागीता वाढविणे हा या कार्यक्रमामागील उद्देश होता. कार्यक्रमाचे आयोजन संयोजक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. (श्रीमती) व्ही. टी. धुर्वे आणि संघटन सचिव डॉ. एस. सी. मसराम यांच्या नेतृत्वात करण्यात आले. कार्यक्रमास श्री. पवन चंकापूर, डॉ. आशिक नगवांशी व अंकिता शर्मा यांनी मदत केली.
गुरुवार, दिनांक ३ ऑक्टोबर रोजी डॉ. (श्रीमती) व्ही. टी. धुर्वे आणि डॉ. एस. सी. मसराम यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले आणि वन्यजीव संवर्धनाबद्दल महत्त्वपूर्ण भाषण दिले. डॉ. आशिककुमार नागवंशी यांनी वन्यजीव संवर्धनावर चर्चा केली. या कार्यक्रमानंतर, एम.एस्सी. विद्यार्थ्यांसाठी वन्यजीव संवर्धनावर आधारित पोस्टर व छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आकर्षक दृश्यात्मक सादरीकरणांद्वारे आपली सर्जनशीलता प्रदर्शित केली. पोस्टर स्पर्धेत प्राची लेंडे, प्रेरणा लंजेवार आणि अमर खुरपडे यांना प्रथम पारितोषिक मिळाले, तर छायाचित्र स्पर्धेत प्रेरणा लांजेवार आणि जितेंद्र राठोड यांनी दुसरे स्थान प्राप्त केले. शुक्रवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ रोजी, प्रसिद्ध व्यक्तींकडून दोन अतिथी व्याख्याने आयोजित करण्यात आली. मुख्य वनसंरक्षक डॉ. के. एस. मानकर (IFS) यांनी वन्यजीव संवर्धनातील आव्हानांचे आणि धोरणांचे महत्व स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्य रेशीम संचालनालयाचे उपनिदेशक श्री. एम. बी. धवळे यांनी रेशीम कलेच्या महत्वाबद्दल चर्चा केली. शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ रोजी, एम.एस्सी. विद्यार्थ्यांसाठी पक्षी निरीक्षण सत्र आयोजित करण्यात आले. ज्यामध्ये नागपूर वन विभाग, श्रीष्टी पर्यावरण मंडळ आणि हेरिटेज कन्झर्वेशन सोसायटीचा सहभाग होता. यानंतर, नागपूर वन विभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला (TTC) अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.
सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी, “बदलत्या जगात वन्यजीव: संवर्धनासाठी डिजिटल साधने” या विषयावर वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली. अमर खुरपडे, वैभवी खोंड आणि निकिता छोटोराय यांना प्रथम पारितोषिक मिळाले, सृष्टी बोरकर यांनी प्रोत्साहन पर पुरस्कार जिंकला. यानंतर वन्यजीव संरक्षण विषयावर एक बहुपर्यायी प्रश्नोत्तरी स्पर्धा झाली. यात विद्यार्थ्यांना त्यांचे ज्ञान तपासण्याची आणि संवादात्मक पद्धतीने शिकण्याची संधी मिळाली. या प्रश्नोत्तरी स्पर्धेत श्रेतांश शहारे, शाजिना खान आणि साक्षी बाजैत विजेते ठरले. अमर खुरपडे यांनी प्रोत्साहन पर पुरस्कार प्राप्त केला.
समारोप कार्यक्रमाचे संचालन अंकिता शर्मा यांनी केले. पुरस्कार वितरण समारंभासह वन्यजीव सप्ताह कार्यक्रमाचे समापन झाले. पवन चकापूरे यांनी वन्यजीव सप्ताह कार्यक्रमाचा संपूर्ण अहवाल वाचला. डॉ. व्ही.टी. धुर्वे आणि डॉ. एस.सी. मसराम यांनी विजेत्यांना प्रमाणपत्रे देऊन सन्मानित केले. डॉ. आशिकुमार नागवंशी यांनी आभार मानले.