ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्तीकरीता इर्री येथे सुरु केले रास्ता रोको आंदोलन

0
317
गोंदिया,दि.१६ः तालुक्यातील मुंडिपार-नवरगाव कला-इर्री या गावातून जाणाऱ्या जडवाहनांवरुन रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट झाल्यामुळें रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.त्यामूळे नागरिकांना ये-जा करतांना खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे सदर रस्ता दुरुस्ती करण्यासंदर्भात बांधकाम विभागाला वारंवार पत्र देऊन व भ्रमणध्वनी द्वारे अनेक कळवून सुद्धा आज पर्यन्त रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात न आल्याने आज नवरगाव कला येथे गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलनास सुरवात केली आहे. जो पर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येणार नाही तो पर्यंत आम्ही रस्तावर बसूनच राहू अशा इशारा दिल्याने या रस्तावरील जडवाहनासह इतर वाहनचालकांना आंदोलनाचा फटका बसायला सुरवात झाली आहे.