सडक अर्जुनी,दि.१६ः-तालुक्यातील हनुमान मंदिर मुरपार/राम येथे हनुमान मंदिराचा भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.तर उदघाटक म्हणून डॉ. रीता अजय लांजेवार यांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉ. भूमेश्वर पटले, पंचायत समिती सडक अर्जुनीच्या सभापती,उपसभापती संगीताबाई खोब्रागडे,डॉ. रुपाली बोपचे, कृ.उ.बा. समितीचे संचालक डि.राहांगडाले, सरपंच ज्ञानेश्वरी पटले उपस्थित होते.
या भव्य भूमिपूजन कार्यक्रमात हनुमान मंदिर उभारणीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला. ज्यामुळे स्थानिकांच्या आस्थेला चालना मिळाली आहे. हनुमान मंदिराच्या उभारणीमुळे मुरपार/राम गावातील धार्मिक वातावरणाला नवीन उर्जितावस्था प्राप्त होईल, असा विश्वास माजी मंत्री बडोले यांनी व्यक्त केला.