
तिरोडा,दि.१९ः– 64-तिरोडा विधानसभा क्षेत्राअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व ग्रामपंचायत मध्ये कार्यरत योजनादुत सर्व यांचे मतदान जनजागृतीपर (SVEEP ) प्रशिक्षणाचे आयोजन पंचायत समिती तिरोडा येथील सभागृहात करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणात 282 केंद्रस्तरीय मतदान अधिकारी(BLO ) व 94 योजनादुत उपस्थित होते. प्रशिक्षण चार टप्प्यात घेण्यात आले. प्रशिक्षणामध्ये विधानसभा क्षेत्रात, कमी वोटिंग टक्केवारी असलेल्या गावात व शहरी भागात SVEEP अंतर्गत रांगोळी स्पर्धा,मानवी साखळी, घोषवाक्य स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, पथनाट्य, सायकल रॅली व नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्याअनुषंगाने विनोदकुमार चौधरी ( नोडल अधिकारी SVEEP तथा गटशिक्षणाधिकारी ),डी.बी.साकुरे,अशोक बरईकर,एच.एम.बोपचे(शि.वि.अधि.),डी. सी. हिरापुरे,विलास डोंगरे,पी.बी.पटले (हाय.शिक्षक ) यु.एम.बोपचे (केंद्रप्रमुख) यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण वर्गाचे संचालन प्रमोद खोब्रागडे (IED समन्वयक )व कुवरलाल रहांगडाले (पद. शि )यांनी केले.प्रशिक्षण वर्गाला नारायण ठाकरे (तहसीलदार) तिरोडा,अश्विनी नंदेश्वर (नायब तहसीलदार) गोरेगाव यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.