गोठणगाव आठवडी बाजारात मतदार जनजागृती 

0
126

गोंदिया, दि.20 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी स्वीप मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव वरुणकुमार शहारे यांचे मार्गदर्शनाखाली 20 ऑक्टोबर 2024 रोजी गोठणगाव येथील आठवडी बाजारामध्ये स्वीप सेल अर्जुनी मोरगाव अंतर्गत तहसिलदार अनिरुध्द कांबळे व स्वीप नोडल स्वाती तायडे यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात मतदार जनजागृती करण्यात आली.